March 30, 2026

काँग्रेस–शिवसेना (उबाठा) आघाडीची कळंब निवडणुकीसाठी घोषणा

कळंब – नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक –२०२५ च्या पार्श्वभूमीवर कळंब शहरात महत्त्वाचा राजकीय घडामोडी घडल्या असून महाविकास आघाडीचे दोन प्रमुख घटकपक्ष — भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी कळंब नगर परिषदेसाठी औपचारिक आघाडीची घोषणा केली आहे.
धर्मनिरपेक्ष विचारांचा वारसा अबाधित ठेवत,एकोप्याने निवडणूक लढवत नगरपरिषदेत सत्ता आणण्याचा संकल्प या दोन्ही पक्षांनी केला आहे.शहराचा सर्वांगीण विकास,मुलभूत सुविधांचा विस्तार आणि कळंबचे वातावरण अधिक समृद्ध करण्यासाठी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्याचा निर्धार दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे पक्ष निरीक्षक दादासाहेब मुंडे,प्रदेश सहसचिव आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पवार यांच्या उपस्थितीत,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास घाडगे पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर ही आघाडी जाहीर करण्यात आली.
या आघाडी प्रक्रियेत पांडुरंग कुंभार (प्रदेश सचीव,भा.रा.कॉ.), आप्पासाहेब शेळके (तालुकाध्यक्ष, भा.रा.कॉ.),संजय मुंदडा (निवडणूक प्रभारी,शिवसेना उबाठा) यांची महत्त्वाची भूमिका राहिली.

error: Content is protected !!