कळंब – शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन चोंदे यांनी पक्षाला रामराम ठोकत खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे-पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना (उबाठा गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. प्रभाग क्रमांक ९ मधून उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराज झालेल्या चोंदे यांनी हा निर्णय घेतला. या वेळी महेश कोळपे,मुकेश चोंदे, दीपक हारकर,आकाश चव्हाण, प्रसन्न हुलसुलकर यांच्यासह सुमारे पन्नास कार्यकर्त्यांनीही उबाठा गटात प्रवेश केला.चोंदे यांनी पूर्वी तालुका प्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते यांच्या नेतृत्वाखाली अनंतराव वाघमारे यांच्यासोबत राहून शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी मोठे योगदान दिले होते. शहरात शिवसेनेचा पाया मजबूत करण्यासाठी त्यांनी निष्ठेने काम केले,मात्र पक्षातील दुर्लक्ष आणि डावलण्याच्या भावनेतून त्यांनी अखेर उबाठा गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. या प्रवेशावेळी माजी आमदार दयानंद गायकवाड,माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा,सागर मुंडे, महिला कार्यकर्त्या धनश्री कवडे, नुकसान बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रवेशामुळे कळंब शहरातील आगामी राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी