March 26, 2026

नेत्रदान संदर्भात जनजागृतीपर उपक्रम उत्साहात

  • धाराशिव (जिमाका) – जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष,जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्यातर्फे तुलसी महिला मंडळ बीड संचलित माता रमाबाई कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तसेच नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन,धाराशिव येथे नेत्रदान संदर्भात जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला.
    या उपक्रमात कक्षाचे सदस्य तथा समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) मनेश खंडागळे यांनी मानवी डोळा,नेत्रदान व त्याचे महत्व,नेत्रदान कोण करू शकते आणि कोण करू शकत नाही,नेत्रदानाची प्रक्रिया व घ्यावयाची काळजी तसेच नेत्रदानाबद्दलचे गैरसमज याबाबत माहिती दिली.
    या प्रसंगी दोन्ही महाविद्यालयांच्या प्राचार्या डॉ.शैलजा पैकेकर आणि प्रा. मीना गदेराव,एनएसएस प्रोग्राम ऑफिसर प्रा.सौरभ भडंगे आणि प्रा. अर्चना कुवरा,विद्यार्थिनी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
    हा उपक्रम कक्षाचे अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरज मोटे यांच्या मार्गदर्शनात,सहकारी तुकाराम डोलारे,महारुद्र नक्षे आणि निरामयसेवा फाऊंडेशनचे कर्मचारी ज्ञानेश्वर टिंगरे यांच्या सहकार्याने राबविण्यात आला.यावेळी वक्त्याने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत उपस्थितांनी नेत्रदानाची शपथ घेतली आणि मरणोत्तर नेत्रदानासाठी नोंदणी केली.
error: Content is protected !!