कळंब – शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प,स्वच्छ प्रशासनाची हमी आणि महिलांसह युवकांना सबलीकरणाचा ठोस कार्यक्रम घेऊन सुनंदा शिवाजी कापसे या आगामी नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरल्या आहेत.शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर जनतेचा वाढता विश्वास पाहता,या निवडणुकीत कळंब शहरात नव्या राजकीय समीकरणांची चिन्हे दिसू लागली आहेत. सामाजिक बांधिलकी,सहकार मूल्ये आणि सेवाभाव या त्रिसूत्रीवर चालणाऱ्या सुनंदा कापसे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक पातळीवर विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारे आपला ठसा उमटवला आहे.महिलांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे,गरजू विद्यार्थ्यांना मदत,तसेच शहरातील नागरी प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठविणे या माध्यमातून त्यांनी जनतेच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. कळंब शहराचा विकास,पारदर्शक प्रशासन आणि प्रत्येक घटकाचा सहभाग हेच आमचे ध्येय आहे, असे सांगत त्यांनी जनतेच्या पाठिंब्याचा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने सांगितले की,कळंबचा विकास हा केवळ घोषणांमध्ये नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून दिसायला हवा.सुनंदा कापसे या संवेदनशील,प्रामाणिक आणि जनतेशी नातं जपणाऱ्या उमेदवार आहेत.त्या शहराच्या प्रगतीसाठी योग्य निवड ठरतील. सोशल मीडियावर सध्या “कळंबच्या विकासाचा मार्ग फक्त धनुष्यबाणाचाच!” हा संदेश मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.विविध वयोगटातील नागरिक,महिला संघटना,आणि युवक मंडळे सुनंदा कापसे यांच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी होत आहेत.शहरातील विविध भागांमध्ये जनसंपर्क दौरे, महिलांच्या बैठका,आणि युवक संवाद उपक्रम सुरू आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात वातावरण तापले असून,प्रत्येक गल्लीबोळात प्रचारफेरी,पोस्टर-बॅनर,आणि घोषवाक्यांचा उत्साह दिसून येतो आहे. नागरिकांमध्ये शहराच्या विकास, पाणीपुरवठा,स्वच्छता,आणि रोजगाराच्या प्रश्नांवर चर्चा रंगू लागल्या आहेत. शहरातील मतदार वर्गात असा सूर ऐकायला मिळतो की,यावेळी कळंबला विकासाचा खरा चेहरा देणारे नेतृत्व हवे,आणि तो चेहरा म्हणजे सुनंदा कापसे!” कळंब शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीच्या वाटेवर ठाम पाऊल टाकण्यासाठी धनुष्यबाण सज्ज झाला आहे.जनतेचा विश्वास,निर्धार आणि विकासाची दिशा यांचे एकत्रित प्रतीक म्हणजेच शिवसेनेचे उमेदवार सुनंदा शिवाजी कापसे — अशी भावना जनतेत उमटत आहे.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन