March 26, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सलमा मुश्ताक सौदागर यांची नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारीची इच्छा व्यक्त

  • प्रभाग क्रमांक १ मध्ये महिला नेतृत्वाची नवी झळाळी!
  • कळंब – आगामी कळंब नगरपरिषद निवडणूक –२०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उमेदवारीसाठी चुरस वाढली आहे.यामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कळंब तालुकाध्यक्ष सौ.सलमा मुश्ताक सौदागर यांनी प्रभाग क्रमांक १ मधून निवडणुकीत उतरायची आपली इच्छा जाहीर केली आहे.
    सौ.सौदागर या पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या महिला तालुकाध्यक्ष म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असून त्यांनी सामाजिक,शैक्षणिक आणि मानवतावादी कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
    कोरोना काळात तसेच अतिवृष्टीच्या संकटात त्यांनी आपल्या वॉर्डातील नागरिकांना किराणा किट,औषधांचे वाटप व तत्काळ मदतकार्य करून हातभार लावला. त्याचबरोबर महिलांच्या स्वावलंबनासाठी आणि बालकांच्या शिक्षणासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
  • “वॉर्डातील सर्वसामान्य नागरिकांची सेवा,विकास आणि महिलांचे सबलीकरण हे माझे ध्येय आहे. पक्षाने मला संधी दिल्यास मी प्रामाणिकपणे आणि जनतेच्या विश्वासास पात्र ठरेन,” असा विश्वास सौ.सौदागर यांनी व्यक्त केला.
    राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत “सलमा सौदागर यांनी संकटकाळात केलेले कार्य लोकांच्या मनात घर करून गेले आहे” असे मत व्यक्त केले.
    सौ.सौदागर यांच्या या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक १ मधील निवडणुकीत रंगत निर्माण झाली असून महिला नेतृत्वाच्या नव्या लाटेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
error: Content is protected !!