कु.श्रेया काळे मुख्यमंत्री तर चि.सुमित माने उपमुख्यमंत्री पदी विराजमान कळंब– तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदुळवाडी येथे बाल संसदेची स्थापना करण्यात आली.यावेळी शाळेतील कुमारी श्रेया संदीप काळे हिची मुख्यमंत्री म्हणून तर चिरंजीव सुमित राम माने याची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली.सार्थक धाबेकर,संघरत्न राऊत,आरवी काळे,सोहम डिकले,सइ डिकले,साक्षी भालेकर,सागर काळे यांची आरोग्य मंत्री,शिक्षणमंत्री,क्रिडा मंत्री, स्वच्छता मंत्री,अन्न मंत्री, शिस्त मंत्री म्हणून निवड करण्यात आली.यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मतदानाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रात्यक्षिक म्हणून भारत निवडणूक आयोगाच्या प्रमाणेच विद्यार्थ्यांना निवडणुकीचे फॉर्म भरण्यापासून ते प्रचारापर्यंत आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतदान व मतमोजणी याचा संपूर्ण अनुभव घेण्याच्या उद्देशाने शाळेच्या वतीने बाल संसद निवडणुकीचे आयोजन करण्यात आले. या निवडणुकीसाठी शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी निवडणुकीला उभे राहण्यापासून ते मतदान करण्यापर्यंत सहभाग नोंदवला. चिठ्ठीवर नाव किंवा अनुक्रमांक लिहून मतदानाचा अनुभव घेतला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर चे हावभाव आणि त्यांचा प्रत्यक्ष सहभाग यामध्ये विद्यार्थ्यात नागरिकत्व आणि त्याबद्दलचा अनुभव दिसून आला. या निवडणुकीसाठी शाळेतील सहशिक्षिका श्रीमती रसिका आगरकर,श्रीमती आशा पवार, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी श्रीमती सुजाता बनसोडे सहशिक्षक श्री सयाजी शिंदे व मुख्याध्यापक संतोष भोजने यांनी परिश्रम घेतले.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड