औसा – औसा नगरपालिकाच्या मार्फत विकास कामाच्या नावाखाली भ्रष्टाचारी लोकांनी बोगस काम केलेले आहे त्याच्या विरोधात भीम आर्मी औसा तालुका संघटक सुनील जोगदंड हे चार दिवसापासून नगरपालिकेसमोर उपोषणास बसलेले असताना नगरपालिकेतर्फे संबंधित गुत्तेदाराने इंजिनियर यांच्या विरोधात अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.आज उपोषणाचा चौथा दिवस असून उपोषणकर्ते सुनील जोगदंडे यांची प्रकृती खालावलेली असतानाही नगरपालिकेचे मुख्य अधिकारी हेउपोषण गांभीर्याने घेत नाही असे दिसून येत आहे संबंधित गुतेदाराने इंजिनियर यांना मुख्याधिकारी पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे उपोषणकर्ते सुनील जोगदंड यांच्या प्रकृतीस काही बरे वाईट झाल्यास त्याची सर्व जबाबदारी हे औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचे असेल तसेच हे उपोषण थांबणार नाही हे येणाऱ्या येणाऱ्या काळात नगरपालिकेच्या विरोधात आणखीन मोठे आंदोलन करण्याचा इशारा माजी मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी दिला यावेळी आजाद समाज पार्टी जिल्हाप्रमुख किशोर सूर्यवंशी, भिम आर्मी औसा तालुका अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे,बालाजी पाठोळे साहेब आदी उपस्तिथ होते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी