धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.04 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 264 कारवाया करुन 1,96,500 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
परंडा पोलीस ठाणे:आरोपी नामे-बालाजी वामन वाघमारे, वय 41 वर्षे, रा.सिरसाव ता. परंडा जि. धाराशिव हे दि.04.11.2025 रोजी 19.00 वा. सु सिरसाव गावातील देवीच्या मंदीराचे उजव्या बाजूस पत्राचे शेडमध्ये अंदाजे 800 ₹ किंमतीची 20 देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
कळंब पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान कळंब पोलीसांनी दि.04.11.2025 रोजी 16.00 वा. सु. कळंब पो ठाणे हद्दीत कळंब येथे मस्सा येथे बसस्थानकाच्या समोरील बाभळीच्या झाडाखाली छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-रुपेश रविंद्र काळे, वय 25वर्षे, रा.मस्सा ता. कळंब जि. धाराशिव हे 16.00 वा. सु. कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 1,850 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले कळंब पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
लोहारा पोलीस ठाणे: आरेापी नामे- सागर बलभिम जाधव, वय 32 वर्षे, रा. द.जेवळी ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.04.11.2025 रोजी 17.30 वा. सु. आपल्या ताब्यातील पॅगो रिक्षा क्र एमएच 25 ई 9738 हा जेवळी बसवेश्वर चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285 मोवाका अन्वये लोहारा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे: आरेापी नामे- धनंजय विश्वनाथ गाडवे, वय 30 वर्षे, यांनी दि.04.11.2025 रोजी 12.30 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे मॉडेल टमटम क्र एमएच 12 जीटी 2127 हा होळकर चौक ते तांदुळवाडी रोड जाणारे रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना कळंब पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285 मोवाका अन्वये कळंब पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ प्राण्यांची निर्दयपणे कत्तल करुन मांस जवळ बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
परंडा पोलीस ठाणे आरोपी नामे-अपशान रशीद कुरेशी, वय 20 वर्षे, मोहम्मद युनुस मोहम्मद इब्राहिम बागवान, वय 36 वर्षे, दोघे रा. कुरेशी गल्ली इंदापुर ता. इंदापुर जि. पुणे, ह.मु. परंडा ता. परंडा जि. धाराशिव, फाजील सौदागर ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.04.11.2025 रोजी 17.00 वा. सु.परंडा ते कुर्डुवाडी जाणारे रोडचे उत्तर बाजूस सिकलकर गल्ली परंडा येथे गोवंशीय जनावरांची निर्दयतेने कत्तल करुन त्याचे कातडे सोलत असताना 1565 किलो गोवंशीय जनावरांचे मांससह दोन लोखंडी चाकु असे एकुण 3,13,000 किंमतीचे मांस परंडा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द कलम 5(क) 9(अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे :आरोपी नामे-विलास लोंढे, बिबीशन लोंऐ, इतर 16 इसम सर्व रा. धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.02.11.2025 रोजी 15.30 वा. सु. जुना बस डेपोच्या पाइीमो शिवरत्न चौक धाराशिव येथे फिर्यादी नामे-पार्वतीबाई राम साळुंके, वय 60 वर्षे, रा. जुना बस डेपोच्या पाठीमागे शिवरतृन चौक धाराशिव ता. जि. धाराशिव यांना व त्यांचा मुलगा नमुद अरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी दांडके, लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचे घरातील सामानाची नासधुस करुन कपाटातील रोख रक्कम 40,000₹ व मंगळसुत्र हिसकावुन नेले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- पार्वतीबाई साळुंके यांनी दि.04.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे धाराशिव शहर येथे भा.न्या.सं.कलम 189(2), 191(2)(3), 190 118(1), 119(1),333, 334(1), 324(4), 352, 351(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“फसवणुक.”
आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे-बिजली मेहतो, रा. सोलापूर ता. जि.सोलापूर यांनी दि.23.05.2025 रोजी 15.00 ते 17.00वा. सु. युनियन बॅक धाराशिव येथे फिर्यादी नामे-भाग्यश्री विठ्ठल लांडगे, वय 26 वर्षे, रा. पाडोळी आ. ता. जि. धाराशिव यांचा नमुद आरोपीने विश्वास संपादन करुन बेकरी मशीन (आहन व इतर साहित्य) आणुन देतो असे सांगुन 12,50,000₹ आरटीजीएस द्वारे व फोनपे द्वारे घेवून कोणत्याही प्रकारची मशिनरी न देता भाग्यश्री लांडगे यांची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- भाग्यश्री लांडगे यांनी दि.04.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे आनंदनगर येथे भा.न्या.सं.कलम 316(2), 318 (4) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे-पवन जाधव, रा. लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.01.05.2025 रोजी 09.37 ते दि.16.05.2025 रोजी 10.00 वा. सु. बजाज फायनान्स धाराशिव येथे फिर्यादी नामे-विलास मधुकर देशमुख, वय 42 वर्षे, रा. पोहनेर ता. जि. धाराशिव यांचा नमुद आरोपीने विश्वास संपादन करुन कंपनीचे घरबसल्या ऑनलाईन काम आहे त्यासाठी आपल्याला तुमचा इंस्टाग्रामवर कंपनीचा आयडी काढावा लागेल असे म्हणुन फिर्यादी यांना विश्वासात घेवून बजाज फायनान्स येथे बनावट आयडी तयार करुन 25,975₹ लोन मंजुर करुन घेवून फिर्यादीची फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विलास देशमुख यांनी दि.04.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे आनंदनगर येथे भा.न्या.सं.कलम 318 (4), 336(2), 336(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
येरमाळा पोलीस ठाणे: मयत नामे-अनुसया रघुनाथ लोहार, रा.बाबा कलेक्शन दुकानासमोर येरमाळा ता. जि. धाराशिव हे दि.06.10.2025 रोजी 08.30 वा. सु. एनएच 52 हायवे रोडवर ज्ञानोदयोग ज्युनिअर कॉलेज जवळून रोडचे कडेने पायी जात होते. दरम्यान मारुती सुझुकी वॅगनर कार क्र एमएच 25 एएस 1002 चा चालकाने त्याचे ताब्यातील वॅगनी कार ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून अनुसया लोहार यांना पाठीमागुन धडक दिली. या अपघातात अनुसया लोहार या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रकाश रघुनाथ कळसाईत, वय 33 वर्षे, रा. बाबा कलेक्शन दुकानासमोर येरमाळा ता. जि. धाराशिव यांनी दि.04.11.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1), 125(अ)(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान