भोगजी— सर्वोदय विद्यालय भोगजी येथे दिनांक ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी शाळेचे मुख्याध्यापक जाधवर गौतम अर्जुन (भाऊ) हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सेवापूर्ती समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रमेश जाधवर यांनी भूषविले,तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्ताराधिकारी सुशील फुलारी आणि केंद्रप्रमुख सोमनाथ चंदनशिव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नूतन मुख्याध्यापक चंद्रकांत वाघमारे यांनी केले,तर सूत्रसंचालन शेख यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.या प्रसंगी आढाळा येथील जि.प. प्रा.शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले.शिवव्याख्याते महादेव खराटे यांनी जाधवर (भाऊ) सरांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सेवाभावाचे कौतुक केले. या सोहळ्यास सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य काकासाहेब मुंडे, गावातील प्रतिष्ठित नागरिक,सरपंच-उपसरपंच, विविध शाळांचे मुख्याध्यापक तसेच संस्थेचे सदस्य,शिक्षक संघाचे प्रतिनिधी आणि जाधवर यांचे नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक रामहारी मुंडे,सौ.घुले मॅडम,तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी दिपक घुगे,सुनील हांगे,भागवत शिंदे आणि खराटे सी.के.यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे सचिव संजय जाधवर यांनी उपस्थितांचे आभार मानले. समर्पण,शिस्त व आदर्श सेवाभावाने प्रेरित अशा जाधवर सरांचा हा निरोप सोहळा सर्वांच्या मनात भावनिक छाप सोडून गेला.
More Stories
माजी प्राचार्य संजय भोसले यांना ‘संस्थामाता सुमनताई मोहेकर’विशेषांक सप्रेम भेट
हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात जागतिक युनानी दिवस उत्साहात
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना कृतज्ञ अभिवादन