धाराशिव — राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र मुंबई येथे दि.५ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या प्रसंगी पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड.रोहिणीताई खडसे,पक्षाचे कार्यालयीन सरचिटणीस रविंद्र पवार,राज्य सरचिटणीस बबन कनावजे,तसेच ग्रामीण युवती प्रदेशाध्यक्षा अमृता काळदाते यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून संघटनात्मक फेरबदल होण्याची चर्चा सुरू होती.कार्यकर्त्यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन जिल्हा संघटनेत बदल करण्याची मागणी केली होती.त्या पार्श्वभूमीवर पक्षाने तात्काळ निर्णय घेत,सक्रिय आणि सर्वसमावेशक नेतृत्वासाठी ओळख असलेल्या डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) अधिक बळकट होईल,असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले की,“या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याला नवी दिशा आणि ऊर्जा मिळेल.” “जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन संघटना मजबूत करण्याचे काम करणार आहे. महाविकास आघाडी घटक पक्षांशी समन्वय साधून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी मी २४ तास उपलब्ध राहीन.”
— डॉ.प्रतापसिंह पाटील नूतन जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)
More Stories
महाराष्ट्रात गेमिंग व क्रिएटर इकॉनॉमीला चालना;डिजिटल पायाभूत सुविधांवर भर — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“स्थगिती नसताना शेतकऱ्यांचे पैसे का अडवले?” – २०२० च्या पीकविम्यावर आमदार कैलास पाटील विधानसभेत आक्रमक
१७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा;शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी – कृषी विभागाचे आवाहन