मुंबई – राज्य निवडणूक आयोगाने अखेर नगरपरिषद निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे.या निवडणुकीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले असताना,आता कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे —
नामनिर्देशन अर्ज भरण्याची मुदत: 10 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर
अर्ज छाननी: 19 नोव्हेंबर
अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख: 21 नोव्हेंबर
मतदानाची तारीख: 2 डिसेंबर
मतमोजणीची तारीख: 3 डिसेंबर
या कार्यक्रमानुसार उमेदवारांना केवळ आठ दिवसांची मुदत अर्ज भरण्यासाठी मिळणार आहे. माघारीनंतर अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार असून, प्रत्येक नगरपरिषद क्षेत्रात पक्षीय संघर्ष, स्थानिक गटबाजी आणि आघाड्यांचे गणित रंगणार आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते,या निवडणुकीत स्थानिक विकास, पाणीपुरवठा,स्वच्छता,रस्ते, घरकुल योजना आणि नागरिक सुविधा या मुद्यांवर मतदारांचा कल ठरणार आहे.सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आतापासूनच प्रचारयोजना आखण्यास सुरुवात केली असून, अनेक ठिकाणी उमेदवार निश्चितीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
More Stories
“पायाभूत विकास मंडळ की ‘टेंडर मॅनेजमेंट’ यंत्रणा?” — आमदार कैलास पाटील यांचा सभागृहात खळबळजनक आरोप
२०३५ पर्यंत एसटी ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा निर्धार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
महाराष्ट्रात गेमिंग व क्रिएटर इकॉनॉमीला चालना;डिजिटल पायाभूत सुविधांवर भर — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस