धाराशिव (जिमाका) – सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने 4 नोव्हेबर 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता धाराशिव येथील बार्शी नाका येथील जिजाऊ चौकातील स्वयंवर मंगल कार्यालय येथे संत तुकाराम महाराजांच्या 375 व्या स्मृती वर्षानिमित्त संस्मरणीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाला पालकमंत्री प्रताप सरनाईक,सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार सर्वश्री विक्रम काळे,सतीश चव्हाण,राणाजगजितसिंह पाटील,कैलास घाडगे-पाटिल,प्रवीण स्वामी,जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक रितू खोखर यांची उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य