कळंब पोलीस ठाणे:आरोपी नामे-रोहीदास देविदास शिंदे, वय 32 वर्षे, रा.गंभीरवाडी ता.कळंब जि. धाराशिव हे दि.31.10.2025 रोजी 18.00 वा. सु आपल्या राहत्या घरा समोर अंदाजे 1,500 ₹ किंमतीची 15 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.तर आरोपी नामे-विशाल सुनिल वाघमारे, वय 25 वर्षे, रा.डिकसळ ता.कळंब जि. धाराशिव हे दि.31.10.2025 रोजी 19.40 वा. सु समर्थच्या पत्र्याच्या शेडच्या बाजूला डिकसळ येथे अंदाजे 960 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 24 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये कळंब पो ठाणे येथे स्वंतत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
आंबी पोलीस ठाणे:आरोपी नामे-नितीन भानुदास उबाळे, वय 40 वर्षे, रा.आंबी ता. भुम जि. धाराशिव हे दि.31.10.2025 रोजी 19.15 वा. सु आंबी ते आनाळा जाणारे रोडच्या कडेला हॉटेल अंबिका च्या आडोशाला अंदाजे 960 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 12 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये आंबी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.30.10.2025 रोजी 17.00 वा. सु. धाराशिव शहर पो ठाणे हद्दीत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय धाराशिव च्या मागील आयोध्या नगर परिसरात धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-सोहेल बाबा शेख, वय 25 वर्षे, रा. उमर मोहल्ला, अमरुत विश्वनाथ शेरखाने, वय 41 वर्षे, रा. काका नगर, रजत हजरत शेख, वय 30 वर्षे, रा. शांतिनिकेतन धाराशिव, मेहफुज जिंदावली शेख, वय 21 वर्षे, रा. खॉजा नगर, शेर मोहम्मद सलीम शेख, वय 41 वर्षे, रा. गालीब नगर, शाकीर हमीद शेख, वय 49 वर्षे, रा. सांजारोड धाराशिव, माजिद हमीद शेख, वय 45 वर्षे, रा. सांजा रोड, आवन विनायक वाघमारे, वय 28 वर्षे, रा. बौध्दनगर, रिजवान खय्याम शेख, वय 39 वर्षे, रा. खॉजा नगर, इरुान इस्माईल शेख, वय 32 वर्षे, रा. खॉजानगर व इतर एक इसम ता. जि. धाराशिव हे 17.00 वा. सु. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय धाराशिव च्या मागील आयोध्या नगर परिसरात धाराशिव येथे मटका जुगाराचे साहित्यासह कागदपत्रांचा संच, मोबाईल,वाहने लॅपटॉप, प्रिंटर, कॅल्क्युलेटर असा एकुण 2,30,030 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान ढोकी पोलीसांनी दि.31.10.2025 रोजी 20.00 वा. सु. ढोकी पो ठाणे हद्दीत कोंड गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक समोर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-काकासाहेब महादेव करडे, वय 28 वर्षे, रा. भिमाशंकर मंदीर रोड कोंड ता. जि. धाराशिव, पंजाब कवडे, रा. वाशी ता. वाशी जि. धाराशिव हे दोघे 20.00 वा. सु. कोंड गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्या मोबाईल फोन एकुण 25,000 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले ढोकी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये ढोकी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
परंडा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान परंडा पोलीसांनी दि.31.10.2025 रोजी 14.05 वा. सु. परंडा पो ठाणे हद्दीत माणकेश्वर येथील मारुती मंदीराचे समोर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- तुषार सुदाम शिंदे, वय 32 वर्षे, रा. माणकेश्वर ता. भुम जि. धाराशिव हे 14.05 वा. सु. माणकेश्वर येथील मारुती मंदीराचे समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 5,010 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले परंडा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान मुरुम पोलीसांनी दि.31.10.2025 रोजी 19.45 वा. सु. मुरुम पो ठाणे हद्दीत बसस्थानक समोर रोडलगत छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- राम दुर्वास कांबळे, वय 39 वर्षे, रा. आनंदनगर मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव हे 19.45 वा. सु. बसस्थानक समोर रोडलगत कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 640 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले मुरुम पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान कळंब पोलीसांनी दि.31.10.2025 रोजी 15.30 ते 17.30 वा. सु. कळंब पो ठाणे हद्दीत 2 ठिकाणी छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-रोहित दिपक गंगावणे, वय 22 वर्षे, रा. मराठवाडा प्लॉट परभणी ह.मु. एस टी कॉलनी कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे 15.30 वा. सु. बाजार मैदान जाणारे रोडलगत कळंब येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 9,150 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले कळंब पो. ठाणेच्या पथकास आढळले. आरोपी नामे-मंथन ज्ञानेश्वर करवलकर, वय 24 वर्षे, रा. सोनार गल्ली कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे 17.33 वा. सु. भंडगे मेडीकल स्टोअर्सचे लगत कट्यावर कळंब येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 2,850 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले कळंब पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये कळंब पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
“अवैध गुटखा विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-हुसेन दगडु औटे, वय 50 वर्षे, आनंद सुभाष सपाटे, वय 38 वर्षे, दोघे रा. केशेगाव ता. जि. धाराशिव यांनी दि.31.10.2025 रोजी 19.20 वा. सु.केशेगाव येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोस्ती पान शॉपमध्ये महाराष्ट्रात शासनाचे प्रतिबंधीत केलेला गुटखा व तत्सव पदार्थ डायरेक्टर पान मसाला, बादशाहा गुटखा, विमल पान मसाला, व्ही1 तंबाखु चे पुडा असा एकुण 6,580 ₹ किंमतीचे विक्री करीता जवळ बाळगुन विक्री करत असताना बेंबळी पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी गुटखा साहित्यासह जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.न्या.सं. कलम- 123,223, 274, 275,3(5) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे :आरोपी नामे-मुब्बशीर नासेर सय्यद, वय 24 वर्षे, सुयश सुनिल वाघमारे, वय 32 वर्षे, दोघे रा. सांळुके नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.30.10.2025 रोजी 17.10 वा. सु.होळकर चौक धाराशिव येथे महाराष्ट्रात शासनाचे प्रतिबंधीत केलेला गुटखा व बादशाहा गुटखा, विमल पान मसाला, व्ही-1 तंबाखु सह हिरो होंडा मोटरसायकल असे एकुण 44,750 ₹ किंमतीचे विक्री करीता जवळ बाळगुन विक्री करत असताना धाराशिव शहर पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी गुटखा साहित्यासह जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.न्या.सं. कलम- 123, 223, 274, 275 सह अन्न सुरक्षा मानके कायदा कलम 59 अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
शिराढोण पोलीस ठाणे:आरोपी नामे-उमेश विष्णु चाळक, रा. करंजकल्ला ता. कळंब जि. धाराशिव, गणेश रामचंद्र खोडसे, वय 32 वर्षे, रा. शिराढोण ता. कळंब जि. धाराशिव, शळु बळीराम शेटे, वय 65 वर्षे, रा. जायफळ ता. कळंब जि. धाराशिव हे तिघे दि.31.10.2025 रोजी 19.52 ते 20.58 वा. सु.आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे मोटरसायकल क्र एमएच 25 एवाय 9110, मोटरसायकल क्र एमएच 25 एएच 2254 व मोटरसायकल क्र एमएच 25 झेड 8437 या शिराढोण शिवारात जायफळ चौक येथे हायगयी व निष्काळजीपणे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून कलम-185 मोवाका चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द शिराढोण पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
“ प्राण्यांना निर्दयपणे वागणुक देवून बांधून ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे आरोपी नामे-विनोद त्र्यंबक काळदाते, वय 37 वर्षे, रा. येळंब ता. बार्शी जि. सोलापुर, रामेश्वर उर्फ आण्णा अभिमान गलांडे, वय 36 वर्षे, रा. येळंब ता. बार्शी जि. सोलापूर यांनी दि.30.10.2025 रोजी 22.55 वा. सु.वैराग नाका येथे भिमनगरकडे जाणारे स्मशानभुमि जवळ पिकअप क्र एमएच 13 ई.पी.0845 मध्ये गोवंशीय जातीचे 4 जर्शी गाय एकुण 65,000₹ किंमतीच्या वाहनासह 8,65,000 ₹ किंमतीचे गोवंशीय जातीचेजर्शी गाय त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने कत्तलीसाठी बेकायदेशीर रित्या वाहतुक करत असताना धाराशिव शहर पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(1) (बी) सह कलम 5(अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ गाव शिवारात आरडा ओरड करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे:आरोपी नामे-अभिजीतसिंह बुबासाहेब बागल, वय 47 वर्षे, रा. शिक्षक कॉलनी धाराशिव ता.जि. धाराशिव हे दि.31.10.2025 रोजी 00.10 वा. सु.छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी गोधंळ घालून आरडा ओरड करुन मदाका कलम 85 महा पो का चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“शस्त्र कायद्यांतर्गतगुन्हा नोंद.”
येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे-यश विश्वनाथ माने, वय 20 वर्षे, रा. तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.31.10.2025 रोजी 21.15 वा. सु. येरमाळा येथील बळीराजा कृषी केंद्र समोर रोडवर येरमाळा येथे लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल असे लोखंडी कोयता, स्टीलची तलवार, असा एकुण 2,500 ₹ किंमतीची विनापरवाना बेकायदेशीर रित्या स्वत:चे जवळ बाळगलेला येरमाळा पोलीसांना मिळून आला. यावर पथकाने नमुद येरमाळा जप्त करुन फिर्यादी नामे-चंद्रहास मोहन मुंढे, पोलीस अंमलदार नेमणुक पोलीस ठाणे येरमाळा यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 4, 25 अन्वये येरमाळा पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
भुम पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-अनिल यादव दुधाळ, वय 56 वर्षे, रा.विद्यानगर भुम ता. भुम जि. धाराशिव यांचे राहते घराचा कुलूप कोंडा अज्ञात व्यक्तीने दि.29.10.2025 रोजी 22.00 ते दि.30.10.2025 रोजी 06.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील कपाटातील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख रक्कम 60,000₹ असा एकुण 1,34,000 ₹ किंमतीचा माला सह एस बी आय बॅक शाखा भुम येथील लॉकरची चावी चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अनिल दुधाळ यांनी दि.31.10.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 305,331(4),62 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-भद्रया महाद्या स्वामी, वय 42 वर्षे, रा. तुरोरी ता. उमरगा जि. धाराशिव यांचे घरातील कपाटातील डब्यामध्ये ठेवलेले 20 ग्रॅम वाजनाचे सोन्याच्या दोन अंगठ्या एकुण 47,000₹ किंमतीच्या या दि.30.10.2025 रोजी 03.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-भद्रया स्वामी यांनी दि.31.10.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 305(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-मधुकर तुकाराम घोडके, वय 57 वर्षे, रा. उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांचे उमरगा शिवारातील शेत गट नं 361/2 मधील बोअरची 7.5 एचपी मोटर,1000 फुट वायर,शेत तळ्यातील भुमी कंपनीची मोटार, तिन खताचे पोते, असा एकुण 65,500₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने दि.25.10.2025 रोजी 23.00 ते दि.31.10.2025 रोजी 05.00 वा. सु. चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मधुकर घोडके यांनी दि.31.10.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या. सं. कलम 303(2),324 (4),324 (5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
कळंब पोलीस ठाणे :आरोपी नामे-इरफान ईलाई अत्तार, आरीफ ईलाई अत्तार, साहिल सत्तार तांबोळी, आसमा इरफान अत्तार, सबा इमरान अत्तार सर्व रा. एस टी कॉलनी इस्लामपूरा डिकसळ ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.26.10.2025 रोजी 22.00 वा. सु. एस.टी कॉलनी इस्लामपुरा डिकसळ येथे फिर्यादी नामे-ईम्रान ईलाई अत्तार, वय33 वर्षे, रा. भोई गल्ली कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद अरोपींनी तु या घरात रहायचे नाही व दुकानावर यायचे नाही असे म्हणुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी झाऱ्याने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- ईम्रान अत्तार यांनी दि.31.10.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे कळंब येथे भा.न्या.सं.कलम 189(2), 189(4), 191(3), 190, 118(1), 115(2), 352, 351(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
ढोकी पोलीस ठाणे: मयत नामे-सुरज आप्पाराव थोरात, वय 21 वर्षे, व सोबत जखमी नामे- रंजीत बालाजी थोरात, वय 20 वर्षे, दोघे रा. बोरगाव बु. ता. कळंब धाराशिव हे दोघे दि.06.10.2025 रोजी 21.40 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 25 एवाय 0619 वरुन जात होते. दरम्यान लातुर ते धाराशिव रोडवर एस बी आय बॅकेच्या जवळ रोडवर ढोकी येथे आयशर टॅम्पोचा चालकाने त्याचे ताब्यातील आयशर टॅम्पो हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून चकीच्या दिशेने त्याचे समोरील वाहनास ओव्हरटेक करुन पुढे जात असताना सुरज थोरात यांचे मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात सुरज थोरात हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर रंजीत थोरात हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आप्पाराव सिताराम थोरात रा. बोरगाव बु. ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.31.10.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106, 106(1), 125, (अ)(ब) सह मपोका कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे आणखी एक मोठे यश” राष्ट्रीय महामार्गावर जॅक टाकून चोरी करणारी अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या.”
आज दि. ०१/११/२०२५ रोजी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेला एक मोठे यश हाता आले. राष्ट्रीय महामार्गावर मध्यारात्री जॅक टाकून प्रवाश्यांच्या गाड्या बंद पाडून दरोडा टाकून लूटणार्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत. मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत होत्या. अगदी मध्यरात्री भर राष्ट्रीय महामार्गावरती अशा घटना घडत होत्या. त्यामुळे सामान्य जनतेच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच दि. १६/१०/२०२५ रोजीच्या मध्यारात्री उमरग्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणार्या एका डॉक्टरचे कुटुंबियांना अशाच प्रकारे लुटण्याचा प्रकार घडला होता. त्याबाबत पोलीस ठाणे मुरुम येथे डॉ. अब्दुल गफूर अब्दुल रउफ जनैदी यांच्या तक्रारीवरून गु.र.नं. ३०९/२०२५ क. ३१०(२), ३११, अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती. रीतु खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. विनोद ईज्जपवार यांना सदरील गुन्ह्याचा तातडीने तपास लावण्याबाबत सुचीत केले होते. त्या अनुसार पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार यांनी आपले आधिनस्त पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना सोबत घेवून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आणि त्यांचे प्रयत्नांना आज यश आले. सदरील गुन्हा उघडकीस आणण्याकरिती तांत्रिक माहिती प्राप्त करून त्याचे विश्लेषण करण्यात आले तसेच पारंपारीक पध्दतीचा देखील वापर करून गन्ह्यातील आरोपी आणि वापरलेली वाहन निष्पन्न करण्यात आले. त्यापैकी १) अर्जून बालाजी शिंदे, २) आशोक हिरामन शिंदे यास ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी पोलीस ठाणे मुरूम हद्दीतील दरोडा ईतर चार साथीदारांच्या मदतीने घातल्याचे कबुल केल तसेच त्यांनी जळगाव जिल्ह्यातही अशाच प्रकारे राष्ट्रीय महामार्गावरती जॅक टाकून गाडी अडवून दरोडा टाकल्याची माहिती दिली. मुरूम येथील गुन्ह्यात वापरलेली XUV500 गाडी आणि जॅक जप्त करण्यात आलेला आहे. त्यासोबतच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या दरोड्यातील ट्रक देखील जप्त करण्यात आलेला आहे.
सदरील कामगिरी मा. श्रीमती रीतु खोखर कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विनोद ईज्जपवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव, सुदर्शन कासार स.पो.नि., पोलीस अंमलदार शौकत पठाण, पोलीस अंमलदार प्रकाश औताडे, पोलीस अंमलदार जावेद काझी, महीला पोलीस अंमलदार शोभा बांगर, पोलीस अंमलदार फरहान पठाण, पोलीस अंमलदार राठोड, चालक पोलीस अंमलदार सुभाष चौरे,, चालक पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड, चालक पोलीस अंमलदार रत्नदीप डोंगरे, चालक पोलीस अंमलदार नागनाथ गुरव. सदरील कामगीरी यशस्वीरित्या पार पाडण्यात QRTआणि RCP पथकाने महत्वपूर्ण भुमिका बजावलेली आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य