शिराढोण ( परमेश्वर खडबडे) – शिराढोण येथे मंजूर असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून,लवकरच हे आरोग्यसेवेचे केंद्र जनतेसाठी खुले होणार आहे. तथापि, रुग्णालय सुरू होण्यापूर्वी आवश्यक पदनिर्मिती व भरती प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे असल्याने,या प्रक्रियेला गती देण्याची मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चाकूरकर यांना निवेदन देऊन,शिराढोण ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठीचा पदनिर्मिती प्रस्ताव शासनाकडे त्वरित पाठवावा,अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर प्रतिसाद देताना डॉ. चाकूरकर यांनी, ग्रामीण रुग्णालय लवकर सुरू व्हावे यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना तातडीने करण्यात येतील, असे आश्वासन दिले. या रुग्णालयामुळे शिराढोण व परिसरातील नागरिकांना तात्काळ व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार असून,गावातील आरोग्यसेवेची मोठी पोकळी भरून निघणार आहे. शिराढोणच्या आरोग्याची नाळ या रुग्णालयाशी जोडलेली आहे. गावातील प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर आरोग्याचे हास्य फुलवण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. जनतेच्या आरोग्य सेवेचा दीप लवकरच प्रज्वलित होईल, असे नितीन लक्ष्मणराव पाटील, अध्यक्ष – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण शासकीय यांनी सांगितले.
More Stories
🕌 सातव्या वर्षी पहिला रोजा;आदम पटेलच्या श्रद्धेचे सर्वत्र कौतुक 🌙
शिराढोण व कळंब तालुक्यातील नागरिकांच्या मागणीला पाठबळ
शिराढोण येथे कॅन्सर तपासणी शिबिर;नागरिकांसाठी मोफत सुविधा