कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव डॉ.अशोकराव (दादा) मोहेकर यांच्या प्रेरणेने,तसेच प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त दि.३१ ऑक्टोबर २०२५ (शुक्रवार) रोजी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय एकता दिन म्हणून भारतातील एकतेचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी प्रा.डॉ.ताटीपामुल यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सरदार पटेल यांचे योगदान आणि संस्थानांच्या विलीनीकरणातील त्यांची ऐतिहासिक भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की,हैदराबाद मुक्तिसंग्रामातील सरदार पटेल यांची कठोर व राष्ट्रहिताची भूमिका आजच्या तरुणांनी आदर्श मानावी. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,ग्रंथपाल प्रा.डॉ.अनिल फाटक,शिक्षकेतर कर्मचारी लोहकरे,गावडे,रमेश पवार,उमेश साळुंखे,आदित्य मडके,तसेच श्रीमती भारती,आंबीरकर,पांचाळ मॅडम व रुमणे मॅडम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे अधीक्षक हनुमंत जाधव आणि सहाय्यक ग्रंथपाल अरविंद शिंदे यांनी परिश्रम घेतले. या उत्साहवर्धक सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागवली आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश पुन्हा अधोरेखित केला.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन