March 26, 2026

स्मशानभूमी सेवक कुटुंबास शिवसेनेचा मदतीचा हात

  • कळंब – शहरातील स्मशानभूमीची देखरेख करणारे संजय इरेवाड आणि त्यांचे कुटुंब समाजासाठी महत्त्वाची सेवा बजावत आहेत.दिवाळीच्या पूर्वसंध्येला शिवसेनेच्या वतीने त्यांच्या कुटुंबासाठी अन्नधान्य, संसारउपयोगी वस्तू आणि शैक्षणिक साहित्याचे किट प्रदान करण्यात आले.हा उपक्रम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
    शिवसेना नेते अजित पिंगळे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांच्या हस्ते हा समाजाभिमुख उपक्रम यशस्वी झाला.गरजूंना हातभार लावणे आणि त्यांच्या आयुष्यात प्रकाशाचा किरण निर्माण करणे हाच खरा दिवाळी उत्सव आहे, असे अजित पिंगळे यांनी सांगितले.
    उपक्रमात शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यामुळे दिवाळीचा सण अधिक अर्थपूर्ण आणि समाधानकारक बनला.
error: Content is protected !!