March 26, 2026

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.17 ऑक्टोंबर रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 199 कारवाया करुन 2,79,7500 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • उमरगा पोलीस ठाणे:आरोपी नामे-बालाजी गोपय्या तेलंग, वय 30 वर्षे, रा. नागराळ गु. ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.17.10.2025 रोजी 19.30 वा. सु हिप्परगा राव कडे जाणारे रोडला खंडु कोराळे यांच्या शेतातील पत्र्याचे शेडच्या बाजूला कोळसुर क येथे अंदाजे 2,000 ₹ किंमतीचे 20 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे:आरोपी नामे-खंडु लक्ष्मण शिंदे, वय 37 वर्षे, रा. रामनगर सांजा ता.जि. धाराशिव हे दि.17.10.2025 रोजी 13.30 वा. सु शिवाजी महाराज चौक येथील ॲक्सीस बॅक समोर अंदाजे 2,580 ₹ किंमतीच्या 24 देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • येरमाळा पोलीस ठाणे:आरोपी नामे-भगवत सोपान काळे, वय 65 वर्षे, रा. खामसवाडी पारधी पिडी ता. वाशी जि. धाराशिव हे दि.17.10.2025 रोजी 17.30 वा. सु आपल्या शेतातील पत्र्याचे शेडमध्ये खामसवाडी येथे अंदाजे 30,400 ₹ किंमतीचे 150 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • उमरगा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.17.10.2025 रोजी 13.30 ते 18.00 वा. सु. उमरगा पो ठाणे हद्दीत 5 ठिकाणी छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-शिवराज शरणाप्पा पुजारी, वय 50 वर्षे, रा. आतलापुर ता. बसवकल्याण जि. बिदर ह.मु. जाधव वस्ती धाकटीवाडी शिवार ता.उमरगा जि. धाराशिव हे 13.30 वा. सु. धाकटीवाउी शिवार जाधव वस्ती येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 1,100 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-इमरान बशिरसाब बागवान, वय 32 वर्षे, रा.कासार शिरशी ता. औसा जि. लातुर हे 16.30 वा. सु. महादेव रेस्टॉरंटच्या शेजारी मारुती हेअर सलुनच्या बाजूला उमरगा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 650 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-ज्ञानोबा भैरोबा चिकुंद्रे, रा. नारंगवाडी ता. उमरगा जि. धाराशिव हे 14.30 वा. सु. अभिनवचायनिज सेंटरबाजूला खुले जागेत सावळसुर पाटी येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 720 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-गणेश गोपाळ मडोळे, वय 25 वर्षे, रा. पतंगे रोड उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 18.15 वा. सु. पंतगे रोड उमरगा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 510 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-गणेश गोपाळ मडोळे, वय 25 वर्षे, रा. पतंगे रोड उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 18.15 वा. सु. पंतगे रोड उमरगा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 510 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-यलाप्पा हणमंत दंडगुले, वय 27 वर्षे, रा. कोळवाडी ता. उमरगा जि. धाराशिव हे 18.00 वा. सु. प्रभात हॉटेलच्या पाठीमागे उमरगा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 600 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 5 गुन्हे नोंदवले आहेत.
  • “ प्राण्यांना निर्दयपणे वागणुक देवून बांधून ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • परंडा पोलीस ठाणे आरोपी नामे-रिहान रियाज कुरेशी, मतीन ख्‌वॉजाकुरेशी दोघे रा. माणकेश्वर ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.17.10.2025 रोजी 04.00 वा. सु. माणकेश्वर येथे स्वताचे घराचे पाठीमागे गोवंशीय जनावरांची कत्तल करुन 230 किलो गोवंशीय मांस अंदाजे 75,200₹ किंमतीचे जवळ बाळगलेले असताना परंडा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द कलम 5 (क),9, 9(अ) प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे आरोपी नामे-समिर मिया शेख, वय 37 वर्षे, रा.सांजा वेस गल्ली धाराशिव ता. धाराशिव, खुर्शीद पाशा शेख, रा. खिरणीमळा धाराशिव अनोळखी इसम दोन यांनी दि.17.10.2025 रोजी 05.30 वा. सु. खुर्शीद पाशा शेख रा. खिरणीमळा धाराशिव यांचे पत्र्याचे शेड येथे गोवंशीय मांस व लहान मोठे 17 जनावरे कत्तलीसाठी ठेवलेले, आयशर टेंम्पो व लोखंडी सुरी सत्तुर असा एकुण 11,41,000 ₹ किंमतीचे गोवंशीय जातीचे लहान व मोठे गायी वासरे हे बांधुन त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने कत्तलीसाठी बेकायदेशीर रित्या बांधुन वाहतुक करत असताना धाराशिव शहर पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(1) (बी) सह प्राणी संरक्षण अधिनियम 5(अ), 5(क), 5(ड), 9, 9(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • वाशी पोलीस ठाणे : दि. 16.10.2025 रोजी 19.30 ते दि. 17.10.2025 रोजी 06.30 वा. सु. कुंथलगिरी जैन मंदीर येथील मेन गेटचे दरवाज्याचे कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने तोडून आत प्रवेश करुन दान पेटीतील 9,00,000 ते 12,00,000₹ रोख रक्कम व देव देवतांच्या पितळी मुर्त्या असा एकुण 9,00,000₹ ते 12,10,500₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- उमंग रविंद्र शहा, वय 45 वर्षे, रा. कुंथलगिरी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.17. 10.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(4), 305(डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • भुम पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- अण्णा अगंद अडतरे, वय 24 वर्षे, रा. देवळाली ता. भुम जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000 ₹ किंमतीची हिरो स्पेलेंडर मोटरसायकल क्र एमएच 25 ए.यु. 3202 ही दि.16.10.2025 रोजी 17.30 ते 19.00 वा. सु. सोलापूर गणेश मंदीराचे शेड मध्ये भुम येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अण्णा अडतरे यांनी दि.17.10.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-सुसेन गणपतराव मळे, वय 70 वर्षे, रा. चिंचोली ता. औसा जि. लातुर
  • यांचे पॅन्टचे खिशातील ओपो कंपनीचा मोबाईल अंदाजे 14,000₹ किंमतीचा विधी संघर्ष बालकाने दि. 17.10.2025 रोजी 13.00 वा. सु. श्री तुळजाभवानी मंदीरातील गणपती मंदीरासमोर चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुसेन मुळे यांनी दि.17.10.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान फिर्यादीने दिलेल्या माहितीवरुन तुळजापूर पोलीसांनी विधी संघर्ष बालकाकडे सदरचा मोबाईल चोरी केले बाबत चौकशी केली असता त्यांने मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली.पुढील कार्यवाही चालु आहे.
  • तामलवाडी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-आण्णा शहाजी कदम, वय 26 वर्षे, रा.पिंपळा खुर्द ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचीस्पेलेंडर प्लस मोटरसायकल क्र एमएच 25 ए.आर. 2764 ही दि. 14.10.2025 रोजी 22.00 ते दि.15.10.2025 रोजी 05.30 वा. सु. मेव्हण्याच्या घरासमोरुन पिंपळा खुर्द येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आण्णा कदम यांनी दि.17.10.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-भिमराव शामराव चव्हाण, वय 65 वर्षे, रा.जळकोटवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि. 14.09.2025 रोजी 00.30 वा. सु. उमरगा येथील बेडदुर्गे हॉस्पीटल येथे आय सी. यु वार्डात उपचार घेत असताना फिर्यादी यांनी टेबलवर ठेवलेल्या पॅन्टच्या खिशातील 50,000 ₹ रोख रक्कम ही आरोपी नामे-रानी निळकंट चव्हाण, रा. येणेगुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-भिमराव चव्हाण यांनी दि.17.10.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 305(ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • कळंब पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- महेंद्र सखाहरी आडसुळ, वय 49 रा. ईटकुर ता. कळंब जि. धाराशिव यांची हिरो होंडा स्पेलेंडर मोटरसायकल क‍्र एमएच 25 व्ही 0935 अंदाजे 25,000₹ किंमतीची ही दि. 08.10.2025 रोजी 18.30 ते दि. 19.40 वा. सु. शेत गट नं 269 ईटकुर भोगजी जाणारे रोडवर भोगजी शिवार येथुन चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महेंद्र आडसुळ दि.17.10.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “लैंगीक अत्याचार.”
  • भुम पोलीस ठाणे :एका गावातील 14 वर्ष 8 मन्यिाची मुलगी (नाव- गावगोपनीय) दि.17.10.2025 रोजी 01.00 वा. सु. हि व तिची आई घरी असताना एका गावातील पाच तरुणाने गैरकायद्याची मंडळी जमवून तिचे आईस शिवीगाळ करुन घराज बाहेरुन कडी लावून नमुद तरुणामधील एका तरुणाने नमुद मुलीस शेतात नेवून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. इतर तरुणांनी शिवीगाळ करुन तु झालेल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास तुला व तुझ्या आईला जिवे ठार मारीन अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतेचे आईने दि.17.10.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64(1), 125, 189(2), 191(2), 193(3), 190, 352, 351(3) सह पोक्सो अधिनियम 4, 8, 12 सह 92 (ड) अपंग व्यक्ती अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!