March 26, 2026

पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय महाविद्यालयाचा आरोग्यदायी हात — आरओ यंत्रांच्या माध्यमातून दिलासा

  • धाराशिव (जिमाका) – अलीकडील पुरामुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले.घरं,शेती,उपजीविका सर्व काही पाण्यात वाहून गेलं.या कठीण काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,धाराशिव यांनी दाखवलेली सामाजिक जबाबदारी खरंच कौतुकास्पद ठरली आहे.
    पूरग्रस्त भागातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे आणि संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखावा,या हेतूने महाविद्यालयाच्या वतीने आरओ वॉटर फिल्टर यंत्र भेट देण्यात आले.अधिकारी,डॉक्टर, परिचारिका,कर्मचारी वर्ग यांनी आपल्या वेतनातून स्वेच्छेने निधी जमा करून ही मदत केली.
    या उपक्रमामागे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चव्हाण आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ.तानाजी लाकाळ यांचे मार्गदर्शन लाभले. पूरग्रस्त भागात आरोग्यसुरक्षेच्या दृष्टीने या उपक्रमामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
    मानवीतेचा संदेश देणारा हा उपक्रम म्हणजे केवळ मदत नव्हे, तर समाजातील संवेदनशीलतेचा एक जिवंत धडा आहे.पूराच्या पाण्याने घरं वाहून गेली,पण माणुसकीचा झरा कोरडा पडला नाही,हे धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
error: Content is protected !!