कळंब – उपजिल्हा रुग्णालय कळंब येथील डॉक्टर व कर्मचारी यांनी आपल्या कर्तव्यदक्ष सेवेचा परिचय देत एकाच दिवशी अकरा शस्त्रक्रिया केल्या.
या यामुळे रुग्णालयातील डॉक्टर व त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे. दिनांक ३० नोव्हेंबर २३ गुरुवार उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे ४ शस्त्रक्रियाद्वारे प्रसुती, ४ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, २ गर्भपात शस्त्रक्रिया, व १ स्तनातील गाठीचे शस्त्रक्रिया अशा ११ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या कार्य तत्परतेचे व सेवेचे कळंब शहरात स्वागत व कौतुक होत आहे वरील शस्त्रक्रिया उपक्रमासाठी प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ.मंजुराणी शेळके, स्त्री रोग तज्ञ डॉ.सायस केंद्रे, डॉ. सी.बी लामतुरे, डॉ.प्रियंका जाधवर,भुलतज्ञ डॉ.अंकुश पवार, व बालरोग तज्ञ डॉ.पुरुषोत्तम पाटील, इनचार्ज सिस्टर जावरकर, उगलमोगले सिस्टर, बनकर सिस्टर,चव्हाण,पारवे, यांनी परीश्रम घेतले.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर