धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.29 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 157 कारवाया करुन 97,700 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई .”
मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहार हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल शुक्रवार दि.29.11.2023 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 11 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला सुमारे 85 लि. गावठी दारु, देशी विदेशी दारुच्या 21 सिलबंद बाटल्या, 350 लि. ताडी असे मद्य जप्त करण्यात आले. सदर मद्य जप्त करुन यांची एकत्रीत किंमत अंदाजे 40,850 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 11 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
1)धाराशिव पो. ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. बौध्दनगर, धाराशिव ता.जि.धाराशिव येथील-सुरज राजेंद्र गाडे, वय 26 वर्षे, हे 12.30 वा. सु. आकाश शहाजी बनसोडे यांचे स्मशानभुमीजवळ असलेल्या पत्राचे शेडसमोर मोकळ्या जागेत बौध्दनगर धाराशिव येथे अंदाजे 800 किंमतीची 10 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
2)वाशी पो. ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. पिंपळगाव क. ता. वाशी जि.धाराशिव येथील- भामाबाई रामा शिंदे, वय 51 वर्षे, हे 14.10 वा. सु. पिंपळगाव क. येथे अंदाजे 1,030 किंमतीची 14 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
3)तामलवाडी पो. ठाणेच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. सांगवीकाटी, ता. तुळजापूर जि.धाराशिव येथील-तोळाबाई धनाजी शिंदे, वय 60 वर्षे, या 15.00 वा. सु. सांगवी काटी येथे अंदाजे 800 किंमतीची 10 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर देवकुरळी ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील- साळुबाई चंद्रकांत तुळसे, वय 40 वर्षे, या 16.15 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या समोर अंदाजे 800 किंमतीची 10 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर केमवाडी, ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील- कमलाबाई कालीदास काळे, वय 40 वर्षे, या 20.30 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या समोर अंदाजे 770 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 11 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
4)येरमाळा पो. ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. पानगाव, ता.कळंब जि.धाराशिव येथील- रामेश्वर शंकर कोळेकर, वय 75 वर्षे, हे 16.50 वा. सु. पानगावचे बसस्थानक येरमाळा ते कळंब जाणारे रोड लगत पानटपरीचे समोर अंदाजे 700 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
5)आनंदनगर पो. ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. पारधी पिढी, सांजा ता. जि.धाराशिव येथील- भगवान सिताराम पवार, वय 51 वर्षे, हे 18.00 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर पारधी पिढी सांजा येथे अंदाजे 2,400 किंमतीची 30 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
6)नळदुर्ग पो. ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. साखर कारखाना अणदुर, ता. तुळजापूर जि.धाराशिव येथील- आलीशान नासीर शेख, वय 35 वर्षे, हे 17.00 वा. सु. नळदुर्ग ते तुळजापूर जाणारे रोडवर असलेले हॉटेल अलीशानचे पाठीमागे आडोशाला अंदाजे 4,450 किंमतीच च्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
7)मुरुम पो. ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. नाईकनगर सु. ता. उमरगा जि.धाराशिव येथील- माणिक मन्नु आडे, वय 45 वर्षे, हे 10.45 वा. सु. विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना सुंदरवाडी समोरील मुरुम ते मुरुममोड जाणारे रोडच्या बाजूस मोकळ्या जागेत येथे अंदाजे 1,100 किंमतीची 11 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
8)लोहारा पो. ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. जेवळी, ता. लोहारा जि. धाराशिव येथील- प्रभावती अरुण शिंदे, वय 26वर्षे, हे 19.20 वा. सु. जेवळी उत्तर गावातील मुसंगजोगी गल्ली येथे आरोपीचे राहते घराचे पाठीमागे मोकळे जागेत अंदाजे 24,000 ₹किंमतीची 300 लि. ताडी दारु जप्त करण्यात आली. तर जेवळी, ता. लोहारा जि. धाराशिव येथील- छायाबाई संजय कल्याणमुळ, वय 45 वर्षे, या 19.20 आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 4,000 ₹किंमतीची 50 लि. ताडी दारु जप्त करण्यात आली.
“ जुगार विरोधी कारवाई.”
भुम पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान भुम पोलीसांनी दि.29.11.2023 रोजी 11.00 वा. सु. भुम पो. ठा.बसस्थानक भुमच्या समोर टपरीजवळ छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)आयाज अब्दुल पठाण, वय 32 वर्षे, रा. गराडा गल्ली भुम ता. भुम जि. धाराशिव हे 11.00 वा. सु. बसस्थानक भुमच्या समोर टपरीजवळ कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 600 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.29.11.2023 रोजी 16.30 वा. सु. येरमाळा पो. ठा.तेरखेडा येथे शांताई मेडीकल समोर पिपरणीच्या झाडाखाली छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)सचिन धर्मराज कसबे, वय 38 वर्षे, रा. तेरखेडा, ता. वाशी जि. धाराशिव हे 16.30 वा. सु. तेरखेडा येथे शांताई मेडीकल समोर पिपरणीच्या झाडाखाली कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,220 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.29.11.2023 रोजी 15.50 वा. सु. उमरगा पो. ठा.हद्दीत प्रभात हॉटेलच्या मागे उमरगा येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)ओमप्रकाश बाबुराव मोरे, वय 49 वर्षे, रा. येळी, ता. उमरगा जि. धाराशिव हे 15.50 वा. सु. प्रभात हॉटेलच्या मागे उमरगा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,050 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान लोहारा पोलीसांनी दि.29.11.2023 रोजी 16.50 वा. सु. लोहारा पो. ठा.हद्दीत पेठसांगवी वेशीतील तांबोळी टभ् स्टॉलचे बाजूस छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)मदार हमीद पठाण, वय 26 वर्षे, रा. पेठसांगवी ता. उमरगा जि. धाराशिव हे 16.50 वा. सु. पेठसांगवी वेशीतील तांबोळी टभ् स्टॉलचे बाजूस कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,050 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान नळदुर्ग पोलीसांनी दि.29.11.2023 रोजी 18.10 वा. सु. नळदुर्ग पो. ठा.हद्दीत नळदुर्ग तुळजापूर रोडचे डाव्या बाजूला एका पत्रयाच्या शेडच्या पाठीमागे आडोशाला वसंतनगर नळदुर्ग येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)जेटप्पा शिवाजी रामपुरे, वय 52 वर्षे, रा. कुमठेवाडी ता. सोलापूर जि. सोलापूर ह.मु. वसंत नगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 18.10 वा. सु.नळदुर्ग तुळजापूर रोडचे डाव्या बाजूला एका पत्रयाच्या शेडच्या पाठीमागे आडोशाला वसंतनगर नळदुर्ग येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,765 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी दि.29.11.2023 रोजी 15.10 ते 15. 30 वा. सु. तुळजापूर पो. ठा.हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)भिमराव बळीराम देडे, वय 40 वर्षे, रा. काक्रंबा ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 15.30 वा. सु.काक्रंबा ता. तुळजापूर येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,090 ₹रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. तर 1)हसन उस्मान नाईकवाडी, वय 48 वर्षे, रा.आपसिंगा, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 15.30 वा. सु.आपसिंगा ता. तुळजापूर येथील तुळजापूर ते आपसिंगा रोडवरील सरकार हॉटेल समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,020 ₹रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.” नळदुर्ग पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)हरीश गुलनेरा बस्वराज, रा. आमलापुरा क्यासनकेरे कुंडलीगी बेल्लारी राजृय कर्नाटक, तसेच 2) हरीशंकर रामसेवक यादव, रा. अंबेवाडी गांधीविकास मंडळ, राजमहल निेमा टाकीजवळ पाटीचाळ सुरत राज्य गुजरात, तसेच 3) अम्रीतपाल कश्मीर सिंग, रा. चाकधरीवार पोस्ट सरना, जि. पठाणकोट, राज्य पंजाब, 4)सुरेश नागन्ना मगकरी,रा. क्रॉस हनुमंतपुरा तुमकुर (सीएमसी) कर्नाटक राज्य या चौघांनी दि.29.11.2023 रोजी 14.30 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे कार क्र एमएच केए 06 एए 1770, कंटेनर क्र जीजे 18 बीव्ही 4255, कंटेनर क्र जीजे 01 सीटी 6211, व सुझुकी कंपनीची कार क्र केए 52 बी 3803 ही वाहने व्यासनगर येथील एनएच 65 सोलापूर ते हैद्राबाद जाणारे हायवे रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना नळदुर्ग पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये नळदुर्ग पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
लोहारा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)नरेश मनोहर माळवदकर, वय 36 वर्षे, रा. लोहारा, ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.29.11.2023 रोजी 12.54 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा क्र एमएच 13 एन 1802 हा छत्रपती शिवाजी महाराज चौक लोहारा येथे बालाजी ज्वेलर्स च्या समोर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये लोहारा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
“हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल”
तामलवाडी पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)निळोबा अरुण गायकवाड, रा. तामलवाडी, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.29.11.2023 रोजी 20.00 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल कृर एमएच 25 एए 5742 हा टोलनाका परिसरात तुळजापूर ते सोलापूर जाणारे एन एच 52 हायवे रोडवर बालाजी अमाईन्स कंपनी समोर सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना तामलवाडी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 279 अन्वये तामलवाडी पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आह.
उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)दिलीप कुमार दास, वय 38 वर्षे, रा. पंडीतीया रोड कलकत्ता यांनी दि.28.11.2023 रोजी 05.00 वा. सु. आपल्या ताब्यातील ट्रक क्र बी आर 01 जीएम 6087 हा उमरगा येथील तुरोरी ते हैद्राबाद एन एच 65 हायवे रोडवर सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना उमरगा पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 279 अन्वये उमरगा पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ फसवणुक.”
तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- सोनाबाई मोतीलाल परदेशी, वय 58 वर्षे, रा. माउली नगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे कानातील फुले सोन्याची आहे की नाही हे चेक करुन देतो म्हणून अनोळखी दोन इसमांनी सोनाबाई परदेशी यांचेकडून अंदाजे 30,000₹ किंमतीचे साडेबारा ग्रॅम वजनाची सोन्याचे दागिने विश्वासाने घेवून ते परत न करत सोनाबाई परदेशी यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सोनाबाई परदेशी यांनी दि.29.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 420, 406, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
आनंदनगर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- शशिकला सुरेश शेरखाने, वय 48 वर्षे, रा. सांजा रोड धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे घराचे कुलूप आरोपी नामे- अविनाश शिवाजी गदाळे, रा. सांजारोड धाराशिव यांनी दि. 27.11.2023 रोजी 21.00 ते दि. 28.11.2023 रोजी 06.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 78 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 70,000₹ असा एकुण 2,84,500 ₹ किंमतीचा माल हा चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शशिकला शेरखाने यांनी दि.29.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1) फकीर बाबु शेख,रा. पिंपळा खु, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.29.11.2023 रोजी 17.00 वा. सु. पिंपळा खुर्द शिवारातील शेतात फिर्यादी नामे-अजय प्रकाश कदम, वय 26 वर्षे, रा. पिंपळा ख. ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- अजय कदम यांनी दि.29.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला