प्रा.सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष व्याख्यान कळंब – स्वातंत्र्यसैनिक,माजी शिक्षणमंत्री आणि समाजवादी नेते प्रा.सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनने दि.११ ऑक्टोबर २०२५ रोजी वार शनिवारी सायंकाळी विशेष व्याख्यानाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ प्रा.डॉ.अरुणकुमार होते,ज्यांनी ‘पूंजीवाद के विभिन्न चरण और आझाद भारत में उभरती चुनौतियां’ या विषयावर सखोल विवेचन केले. डॉ.अरुणकुमार यांनी स्वातंत्र्योत्तर भारतातील आर्थिक विकासाचे टप्पे,भांडवलशाही वाढ, सामाजिक विषमता,रोजगार व उत्पादनातील असंतुलन यांचा सखोल आढावा घेतला.त्यांनी सांगितले की,बाजार उपभोगवादाला प्रोत्साहन देत असल्यामुळे मूलभूत समस्या दुर्लक्षित होत आहेत,ज्यामुळे लोककल्याणावर लक्ष कमी होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष साथी गजानन खातू यांनी प्रा.वर्दे यांच्या समाजवादी मूल्यांचा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला.प्रास्ताविकात साथी सुभाष वारे यांनी प्रा.वर्दे यांच्या व्यक्तिमत्वाची माहिती दिली. सूत्रसंचालन उपेंद्र टण्णू यांनी केले,तर आभार राहुल भोसले यांनी मानले.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन