February 9, 2026

अतिवृष्टीग्रस्तांना ‘वॉटर संस्था आणि इंडसइंड बँकेची मुरघास चाऱ्याची मदत

  • कळंब – धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. पिकांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी जनावरे वाहून जाणे, गोठ्यात पाणी शिरल्याने जनावरे दगावणे आणि जनावरांचा चारा वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
    शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, कळंब यांच्या वतीने आणि इंडसइंड बँक यांच्या अर्थसहायातून अतिवृष्टी आपत्ती निवारण – मुरघास चारा मदत कार्यक्रम घेण्यात आला.इंडसइंड बँकेच्या अर्थसहाय्यातून चालणाऱ्या ‘धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण समुदाय समग्र विकास कार्यक्रम’ अंतर्गत कळंब तालुक्यात समुदाय विकास पाणी, माती,शेती,शिक्षण,आरोग्य आणि पोषण या घटकांद्वारे अनेक विकासात्मक कामे झाली आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून आपत्तीकाळात ही मदत करण्यात आली.
    या मदतीच्या माध्यमातून कळंब तालुक्यातील मंगरूळ,शेलगाव जहागीर आणि सातेफळ या तीन गावांमध्ये एकूण 146 शेतकऱ्यांना त्यांचे जनावरा साठी प्रत्येकी 100 किलो मुरघास चाऱ्याची मदत करण्यात आली.
    या मदत कार्यक्रमासाठी मंगरूळ येथे डॉ. पूजा राऊत मॅडम -पशुधन विकास अधिकारी,सोनवणे ग्रामसेवक,राहुल निकम तलाठी, केवळबाई शिंदे सरपंच,उपसरपंच समाधान कानडे,ग्राम विकास समिती अध्यक्ष राहुल काळे, भागचंद भागरेचा व शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच सातेफळ येथे संजीवनी जाधव ग्रामसेवक,महेश मुकदम तलाठी, श्रीकृष्ण नाईकवाडे कृषी सहाय्यक ,वैभव गरड उपसरपंच आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट कळंब चे तालुका समन्वयक अनिल वांढेकर,सोसियल ऑफिसर मनेश फंदे,संदीप बारखडे,आशुतोष शिंदे,सागर हाडे,महेश माळी,सुपर व्हायझर अक्रूर जाधव,प्रियांका गायकवाड, उर्मिला तवले उपस्थित होते.
    अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती पाहता, वॉटर संस्थेने केलेल्या या तातडीच्या मदतीबद्दल शेतकरी आणि ग्रामस्थांनी संस्थेचे आणि इंडसइंड बँकेचे मनपूर्वक आभार व्यक्त केले.
error: Content is protected !!