February 9, 2026

शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५०,००० मदत व सरसकट कर्जमाफीची मागणी

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून कळंब तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
  • कळंब – अतिवृष्टी व पुरामुळे कळंब तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्यातील शेतकरी वर्गावर अभूतपूर्व संकट कोसळले आहे. मुसळधार पावसामुळे पिकांचे, घरांचे व जनावरांचे प्रचंड नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तालुकाप्रमुख सचिन काळे यांच्या नेतृत्वाखाली कळंब तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
    या वेळी तहसीलदारांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक दिलासा देण्याची मागणी करण्यात आली.
    निवेदनात नमूद करण्यात आले की,शासनाने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी असून ती अत्यंत अपुरी आहे. खरीप हंगाम पूर्णतः उद्ध्वस्त झाला असून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याने वाहून गेल्या आहेत. काहींची जनावरे मृत पावली आहेत, तर अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
    निवेदनातील प्रमुख मागण्या –
    कळंब तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ₹५०,००० मदत द्यावी,जनावरांच्या मृत्यूविषयीच्या पंचनामे प्रक्रियेत सवलत देऊन तत्काळ मदत वितरित करावी,शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार कमी करण्यासाठी सरसकट कर्जमाफी जाहीर करावी,जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करून चारा छावण्या उभाराव्यात,नवीन शेतीसाठी बियाणे,खते आणि डिझेल सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावेत,पाण्यामुळे खरडून गेलेल्या जमिनींचे सर्वेक्षण करून वाढीव मदत द्यावी,रोजगारहिन झालेल्या शेतमजुरांसाठी विशेष मदत जाहीर करावी.
    याप्रसंगी तालुकाप्रमुख सचिन काळे म्हणाले की,“शेतकऱ्यांचा जीवनमरणाचा प्रश्न सरकारने गांभीर्याने घ्यावा. केवळ आश्वासने न देता ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ न्याय द्यावा. शिवसेना सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.
    या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख प्रदीप मेटे,प्रा.संजय कांबळे, दिलीप पाटील,भारत सांगळे, सागर बाराते,मनोहर धोंगडे,संदीप पालकर,प्रतिक गायकवाड, अभयसिंह अडसूळ,पंडित देशमुख,विश्वजीत जाधव,अमृत जाधव,अक्षय बाराते,मालोजी पाटील,गोकुळ देशमुख, आबासाहेब मुळीक,वैभव जाधव, शशिकांत पाटील,नेताजी जावळे, ओंकार बांगर, नितीन चौधरी, प्रदीप गायकवाड, राजाभाऊ आगरकर,अभिनंदन मते,सचिन हिरे, किरण लोमटे, प्रशांत धोंगडे, विठ्ठल समुद्रे, आश्रुबा बिक्कड, अशोक आव्हाड, सुधाकर टेळे, प्रदीप फरताडे, चरण पाटील, समाधान बाराते, प्रज्योत माने, सयाजी साळुंके, बिभीषण देशमुख, संजय भोसले, बिभीषण गायकवाड, बाळासाहेब काळे, लक्ष्मण रितापुरे, राहुल पाटील, नदीम मुलाणी, रामेश्वर जमाले, बंडू यादव, अफसर पठाण, सचिन कापसे, किसन भिसे यांच्यासह शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!