कळंब –पवित्र अशोक विजयादशमी दिवशी नागपूरच्या क्रांतिकारी भूमीत विश्वरत्न,परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या पवित्र अशा बौद्ध धम्माची दिक्षा दिली.त्यामुळे सर्व शोषीत,उपेक्षित समाज बौद्धमय झाला.या क्रांतिकारी दिवसाचे महत्व आधुनिक युवकांना कळावे तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात व आनंदात कळंब शहरांमध्ये दि.२ ऑक्टोबर २०२५ रोजी ५०० फूट लांब भव्य अशी धम्म ध्वज रॅली काढण्यात येणार आहे.यामध्ये सर्व महिला,बालक ते वयोवृद्धापासून सर्वांनी शुभ्रवस्त्र परिधान करून पंचशील ध्वज हातामध्ये घेऊन ११ वाजता येण्याची सुचना करण्यात आली. तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरापासून या रॅलीला सुरूवात होणार आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी