September 21, 2026

बॉडी बिल्डिंग स्पर्धेत मोहेकर महाविद्यालयाचा विजयाचा झेंडा फडकला

  • ऋत्विक जाधव दुसऱ्या क्रमांकाने सिल्व्हर मेडलचा मानकरी
  • कळंब– नुकत्याच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत आयोजित आंतर-महाविद्यालयीन बॉडी बिल्डिंग स्पर्धा संत ज्ञानेश्वर महाविद्यालय,सोयगाव येथे पार पडल्या.या स्पर्धेतही कामगिरी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने आणि प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब येथील विद्यार्थी ऋत्विक जाधव याने ६०–६५ किलो वजनी गटामध्ये दुसरा क्रमांक पटकावत सिल्व्हर मेडल मिळवून महाविद्यालयाचा गौरव वाढवला.
    स्पर्धेसाठी मार्गदर्शक सुरज धर्मराज गपाट यांनी विशेष प्रशिक्षण दिले.
    ऋत्विकच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ.अशोक मोहेकर,प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,उपप्राचार्य डॉ. के.डी.जाधव यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!