March 26, 2026

“नवरात्र ” म्हणजे माती,बीज आणि पाणी परीक्षण करण्याची कार्यशाळा– डॉ.क्रांती मोरे

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ. हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब जिल्हा धाराशिव इतिहास विभाग , जिजाऊ ब्रिगेड कळंब आणि इनरव्हील क्लब कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “जागर स्त्री शक्तीचा,गौरव तिच्या कर्तुत्वाचा सन्मान स्त्रीमुक्तीचा” या विषयावर महाविद्यालयात दिनांक २४ सप्टेंबर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
    या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रा. अंजली मोहेकर यांनी दसऱ्याला जसा आपण घरातील सगळी जळमटं काढून टाकतो त्याच पद्धतीने माणसाने पण आपल्या मनातील वाईट भावना काढून टाकाव्यात,मानव म्हणून जीवन जगावे.असे याप्रसंगी सांगितले, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.हेमंत भगवान होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.क्रांती मोरे, शिवाजी महाविद्यालय,रेनापुर या होत्या.
    याप्रसंगी त्यांनी नवरात्र म्हणजे माती,बीज,आणि पाणी परीक्षण करण्याची कार्यशाळा असून ती दहा दिवसाची असते म्हणजेच घटस्थापना त्यामागील वैज्ञानिक कारण स्पष्ट केले.त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला घालायचे असतील तर अगोदर जिजाऊ स्वतःजन्माला घातल्या पाहिजेत असे मत व्यक्त केले.यावेळी इनरव्हील क्लब कळंब व जिजाऊ ब्रिगेड कळंब यांच्याकडून वेगवेगळ्या क्षेत्रातील नऊ महिलांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला.यामध्ये माजी प्राचार्य मनोरमा अरुण शेळके,सौ. रमा अनंतराव रत्नपारखी,सौ. सुरेखा चंद्रशेखर बारटक्के,सुनंदा भानुदास खराटे,सौ.जयश्री शिवाजी कुपकर,त्रिवेणी सौदागर कसबे,श्रीमती कमलबाई चंद्रकांत महाद्वार,सौ सरस्वती महादेव अडसूळ,सत्यभामा फुलचंद पवार, अशा या महिलांच्या कर्तुत्वाचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला.याच कार्यशाळेत मुलींनी नवदुर्गांची वेशभूषा केलेली होती, यामध्ये माधवी टेकाळे, शिवानी परजने, प्रतीक्षा गायकवाड, प्रांजली शिंनगारे, भैरवी पवार, मयुरी कोल्हे, समीक्षा कशिद , सारिका कांबळे या सर्व विद्यार्थिनींनी नवदुर्गांची वेशभूषा केली होती.त्यामुळे त्यांनाही सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी रमा रत्नपारखी यांचा पर्यावरण पूरक प्लास्टिकच्या पिशवीवरचे भारुड त्यांनी सादर केले,यानिमित्ताने झीनत मुल्ला आणि मार्गदर्शक डॉ.श्रीकांत भोसले यांना आविष्कार स्पर्धेत यश मिळाल्या बदल सत्कार करण्यात आला.
    याप्रसंगी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ.प्रतिभा भवर , जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष डॉ.वर्षा जाधव,उपप्राचार्य डॉ.के. डी.जाधव,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य जयंत भोसले, प्रा.जे.एच.काझी,इतिहास विभाग प्रमुख डॉ.के डब्ल्यू पावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा.अर्चना मुखेडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन डॉ.दत्ता साकोळे यांनी केले तर आभार डॉ.मीनाक्षी जाधव यांनी मानले.यावेळी इनरव्हील सदस्य सौ.निता देवडा , डॉ.मीनाक्षी भवर,सौ.राज्यश्री देशमुख, प्रा.मिटकरी,प्रा.शेळके,सौ.संगीता घुले,सौ.गोरे व जिजाऊ ब्रिगेड चे चे सर्व पदाधिकारी,कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते.
    या कार्यक्रमासाठी अधीक्षक हनुमंत जाधव,सरस्वती वायभसे,संतोष मोरे,अर्जुन वाघमारे,संदीप सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.
error: Content is protected !!