कळंब – “लिंगसमभावा शिवाय समाजाचे सर्वांगीण आरोग्य व विकास शक्य नाही,” असे प्रतिपादन मावा संस्थेचे प्रवर्तक गणमित्र फुले यांनी केले. शालेय शिक्षण विभाग व युनिसेफ यांच्या सहकार्याने मावा संस्थेतर्फे धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित लिंगसमभाव कार्यशाळेत ते मार्गदर्शन करत होते. फुले यांनी समाजातील विदारक वास्तव उलगडून दाखविताना पुरुषप्रधान मानसिकता,स्त्रियांवरील अन्याय आणि संधींच्या असमान वाटपामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक ताणतणावांची उदाहरणे दिली.लिंगसमभाव जपला गेला तरच कुटुंब,शैक्षणिक संस्था आणि व्यापक समाजाच्या प्रगतीचा पाया मजबूत होतो,असे त्यांनी सांगितले. यावेळी मावा संस्थेचे पंकज पडोळे,प्रविण थोटे,मराठी विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत पवार,प्रा.सुकेशनी गव्हाणे,प्रा.मोहिनी शिंदे,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,निर्देशक राजकुमार शिंदे व बालाजी रामरुळे आदीसह तालुक्यातील शिक्षकांची उपस्थिती होती.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड