कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल,कळंब प्रशालेत मराठवाडा मुक्तीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.जी.कुंभार यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर त्यांच्या हस्तेच ध्वजारोहण करून उपस्थितांना देशभक्तीची प्रेरणा देण्यात आली. या प्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक व्ही. एस. मयाचारी, पर्यवेक्षक श्रीमती जे. एन. कोळी, तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या दिनाचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेत देशभक्तीपर घोषणा दिल्या. कार्यक्रमाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी समन्वय साधून उत्सव यशस्वीरीत्या पार पाडला.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी