February 9, 2026

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तांदुळवाडी शाळेत प्रिंटर व पंखे अर्पण सोहळा उत्साहात संपन्न

  • तांदुळवाडी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदुळवाडी येथे दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात व ग्रामसहभागातून साजरा करण्यात आला.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच ॲड.प्रणित शामराव डिकले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक संतोष भोजने यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.
    शाळेत आयोजित मुख्य कार्यक्रमात ग्रामपंचायत व लोकसहभागातून शाळेला नवीन प्रिंटर व पंखे भेट देण्यात आले. यावेळी बोलताना सरपंच ॲड. प्रणित डिकले यांनी शाळेच्या भौतिक सुविधांचा विकास व शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी गावकरी,पालक व ग्रामपंचायत सदैव एकत्र राहून योगदान देतील, असे आश्वासन दिले. मुख्याध्यापक संतोष भोजने यांनी शिक्षकवृंदही तन-मन-धनाने शाळेच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
    विद्यार्थी हिताच्या अनेक योजनांची माहिती पालकांना देण्यात आली. तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्या वीरांवर विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली.
    यामध्ये कु. स्वप्नाली डिकले, अंकिता अंबुरे, आरती वीर, पंकजा सावंत, संघरत्न राऊत, राजवीर काळे, आरवी काळे, आदित्य नाईकनवरे, प्रज्वल बाकले, शिवम डिकले, वेदांत सावंत, आकांक्षा काळे यांनी प्रभावी वक्तृत्व केले.
    कु. ऋजुता मोरे हिने सादर केलेल्या मराठवाडा गीताला उपस्थितांकडून दाद मिळाली. तिच्या कलागुणांची दखल घेत शालेय समिती सदस्य श्री जुबेर पठाण यांनी तिला एक्कावन्न रुपये बक्षीस दिले.
    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष माधव पाटील यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी सरपंच ॲड.प्रणित डिकले होते.
    प्रास्ताविक शिक्षक संतोष मोहिते यांनी केले. सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षिका आशा पवार यांनी केले तर आभारप्रदर्शन रसिका आगरकर यांनी केले.
    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक सयाजी शिंदे, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी सुजाता बनसोडे, शालेय पोषण आहार कर्मचारी रुक्मिणी डिकले, मयुरी डिकले आदींनी विशेष परिश्रम घेतले.
    या प्रसंगी ग्राम महसूल अधिकारी, उपसरपंच महावीर डिकले, सुनील काळे, समिती सदस्य जुबेर पठाण, सुहास धाबेकर, गोवर्धन डिकले, माजी केंद्र प्रमुख बोराडे सर, राम माने, नवनाथ काळे, अनंत पोपळे, अंगणवाडी सेविका खोसे ताई, काळे ताई, मदतनीस लिमकर यांच्यासह मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
error: Content is protected !!