कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित ज्ञानोद्योग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या लातूर जिल्हा नियोजन समिती तथा जिल्हा परिषद सदस्य सीना सिरसाट-ढगे यांचे वडील कान्होजी लिंबाजी सिरसाट (वय – ८१ वर्ष) मु.पो.पिंपळनेर जि.बीड यांचे बुधवार दिनांक १० रोजी रात्री ९ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. कान्होजी लिंबाजी सिरसाट हे अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते.त्यांना पिंपळनेर आणि बीड परिसरात ‘दादा’ या नावाने ओळखले जात होते. ते महावितरण मध्ये सेवा करून सेवानिवृत्त झाले होते.त्यांच्यावर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. बुधवार दिनांक १० रोजी दररोजच्या प्रमाणे घरी आराम करत असताना अचानक रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना, तीन मुली,जावाई नातू,पणतू असा मोठा परिवार आहे.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन