March 26, 2026

संत गाडगेबाबा विद्यापीठात प्रशांत दामले सन्मानित

  • पिंपळोद -दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद येथील कवी ,लेखक , कलावंत, प्रशांत दामले हे आर्ट कॉमर्स कॉलेज येवदा येथील विद्यार्थी आहेत. नुकतेच ११ सप्टेंबर २०२५ गुरवार रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, पदव्युत्तर मराठी विभाग ध्दारा आयोजित , विश्वबंधुत्व दिनानिमित्त कवी, केशवसुत काव्यस्पर्धा दृकश्राव्य सभागृह येथे आयोजित केली होती. प्रशांत दामले हे शेती मातीतले कवी आहेत, त्यांच्या कवीतेने संपूर्ण सभागृहातील स्पर्धक खूप भाऊक झाले होते. टाळ्यांच्या गजरात वाह वाह मिळवली, विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला, ग्रामीण भागात साहित्याची आवड असणारे प्रशांत दामले दर्जेदार कविता सादर केल्या बद्दल सन्मान पत्र देवून सन्मानित करण्यात आले, या स्पर्धेत ५ जिल्हातून स्पर्धक सहभागी होते . पुसद, बुलढाणा, हिगंघाट, अकोला, व अमरावती, कवी केशवसुत काव्य स्पर्धेचे आयोजन कोलते सर, मोना चीमोटो मॅडम, डॉ सुनील सर, हेमंत सर, डॉ,वर्षा मॅडम, यांच्या उपस्थिती प्रशांत दामले यांना सन्मानित करण्यात आले त्या बद्दल आर्ट कॉमर्स कॉलेज चे प्राचार्य डॉ. वाय.जी .सिंग सर , डॉ.अतुल टेवरे सर, डॉ. प्रदिप डोगरे सर, डॉ. प्रभाकर जांभुळे सर, डॉ.अनिल कत्रोजवार सर, प्रा.सुनील थोरात, डॉ.हेमलता ढगे मॅडम, डॉ. सैयद सज्जात डॉ.मोहम्मत अजिमोहद्दिन,प्रा. विनायक राठोड, डॉ.देवानंद मोहोड, डॉ. सुनिता सावरकर यांनी प्रशांत दामले यांचे कौतुक करत खूप खूप शुभेच्छा दिल्या..!
error: Content is protected !!