कळंब – धाराशिव जिल्हा युवक महोत्सव २०२५ जवाहर महाविद्यालय,अणदूर येथे उत्साहात पार पडला.या महोत्सवात वसंतराव काळे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स, कळंब येथील विद्यार्थिनी कु. पारखे हिने शास्त्रीय नृत्य या कलाप्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच एकांकिका स्पर्धेत महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाचा लौकिक वाढविला. या विजयी कलावंतांचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. शहरातील सामाजिक कार्यकर्ते अशोक आप्पा चोंदे आणि आध्यात्मिक मार्गदर्शक महादेव महाराज अडसूळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लंकेश्चर थोरात यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या. या कलाप्रकारात प्राध्यापिका गरड व प्राध्यापक अजय लाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव लकडे यांनीही विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी