उत्कृष्ट नृत्यसंघाचा किताब पटकावला कळंब –छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा तर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव नुकताच तुळजापूर तालुक्यातील जवाहर महाविद्यालय,अणदूर येथे दोन दिवसांच्या कालावधीत संपन्न झाला.या महोत्सवात ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ. हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब संघाने अप्रतिम कलासादरीकरण करीत उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.
कार्यक्रमातील विजेत्यांना सिनेअभिनेत्री रूपलक्ष्मी चौगुले, अभिनेते योगेश शिरसाट यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या महोत्सवात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब यांनी एकूण ५ कलाप्रकारात सहभाग नोंदविला. विशेषत: नृत्यविभागात महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी बजावत “उत्कृष्ट नृत्यसंघ” हा मानाचा किताब पटकावला. भारतीय शास्त्रीय वैयक्तिक नृत्य प्रकारात इब्राहिम शेख याने प्रथम क्रमांक पटकावला. लोक-आदिवासी नृत्य प्रकारात त्रिपुरा राज्यातील प्रसिद्ध ‘होजागिरी’ नृत्यप्रकार सादर करून संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. यशस्वी संघातील कलाकारांमध्ये मयुरी कोल्हे,माधवी टेकाळे, माधवी शिनगारे,इब्राहिम शेख, प्रांजली शिनगारे,स्नेहल कांबळे, झीनत मुल्ला,शिवानी पर्जने यांचा समावेश होता. तसेच वक्तृत्व स्पर्धेत आकाश बारस्कर,प्रश्नमंजुषा स्पर्धेत ज्ञानेश्वरी पांचाळ,झीनत मुल्ला, शिवानी पर्जने यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. विद्यार्थ्यांना या स्पर्धेत यश मिळवून देण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.दत्ता साकोळे, प्रा.अर्चना मुखेडकर,प्रा.मारुती शिंपले यांनी मार्गदर्शन केले. नृत्यदिग्दर्शक म्हणून स्वप्नील कोरे यांचे विशेष योगदान लाभले. या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. अशोक मोहेकर,संचालक डॉ. संजय कांबळे,प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,उपप्राचार्य डॉ.कमलाकर जाधव,अधीक्षक हनुमंत जाधव यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन