खामसवाडी – कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील ग्रामदैवत रोकडेश्वरी देवीची यात्रा दसऱ्याला मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.या यात्रा महोत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच प्रभाकर शेळके यांची गावकऱ्यांनी सर्वांनुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली. रविवार दि.७ सप्टेंबर २०२५ रोजी ग्रामदैवत रोकडेश्वरी देवीच्या यात्रा महोत्सव तयारीसाठी गावकऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये सर्वानुमते कमीटीच्या अध्यक्षपदी प्रभाकर शेळके यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी ग्रामपंचायत सदस्य विश्वास कोकणे,सचिव धनंजय शेळके,कोषाध्यक्ष श्रीराम शेळके, तर सदस्य पदी सादिक सय्यद, मधुकर शेळके,महादेव शेळके, मोहन कोळी,अविनाश शेळके, हनुमंत शेळके,किरण पाटील, यांची निवड करण्यात आली आहे. तर ज्योतीसिंग राठोड हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. दि.२२ सप्टेंबर २०२५ पासून या यात्रा महोत्सवास प्रारंभ होणार आहे. तसेच अष्टमी व नवमीला यात्रेचा मुख्य दिवस आहे.सदरील निवडी बद्दल ग्रामस्थांमधुन कमिटीचे अभिनंदन होत आहे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड