February 9, 2026

मागासवर्गीय महिलांसाठी १०० टक्के अनुदानावर शिलाई कम पिको-फॉल मशीन

  • धाराशिव, दि.८ सप्टेंबर (जिमाका) जिल्हा परिषद स्वसंपादीत उत्पन्नातील २० टक्के समाज कल्याण सेस योजनेअंतर्गत सन २०२५ – २०२६ या आर्थिक वर्षात मागासवर्गीय महिलांना १०० टक्के अनुदानावर शिलाई कम पिको-फॉल मशीन देण्यात येणार आहेत.
  • या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पात्र महिलांनी आपला परिपूर्ण अर्ज गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्यामार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद, धाराशिव यांचेकडे दिनांक २६ सप्टेंबर २०२५ पर्यंत सादर करावा.
  • अर्जाचा विहीत नमुना,अटी-नियम व आवश्यक कागदपत्रांची माहिती सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच अर्जाचे नमुने dharashiv.nic.in व www.zpdharashiv.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत.जास्तीत जास्त मागासवर्गीय महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
error: Content is protected !!