धाराशिव (जिमाका)- राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान (अन्नधान्य व वाणिज्यिक पिके) तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया)अंतर्गत रब्बी हंगाम २०२५ -२६ मध्ये गहू,कडधान्य,पौष्टिक तृणधान्य,ऊस,करडई,मोहरी व सूर्यफूल या पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पिक प्रात्यक्षिके राबविण्यात येणार आहेत.यासाठी कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे ३१ मार्च २०२४ पूर्वी नोंदणीकृत शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था अर्ज करू शकतात.अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर (https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin) “बियाणे वितरण,प्रात्यक्षिक,फ्लेक्सी घटक,औषधे आणि खते” या टाईल अंतर्गत सुविधा उपलब्ध आहे.अर्ज सादर करण्याची प्रक्रिया २ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाली आहे. गटांची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर होणार असून,अर्ज करणाऱ्या व लाभ घेणाऱ्या सर्व सदस्यांचा Farmer ID अनिवार्य आहे. जास्तीत जास्त शेतकरी गटांनी या योजनेअंतर्गत अर्ज करून पिक प्रात्यक्षिकांचा लाभ घ्यावा,असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान