February 9, 2026

कळंब येथे तेरणा ट्रस्टतर्फे भव्य आरोग्य शिबिर

  • ७६१ नागरिकांची तपासणी,१३९ रुग्ण पुढील उपचारासाठी मुंबईला
  • कळंब – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,दत्तनगर येथे तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर,नेरुळ (नवी मुंबई) यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
    या उपक्रमास आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले.शिबिरासाठी तेरणा ट्रस्टचे संचालक विजेंद्र (अण्णा) चव्हाण, अशोकराव शिंदे,डॉ.अशोक (दादा) मोहेकर,मकरंद पाटील, अरुणकाका चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
    शिबिरात मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी हृदयरोग,स्त्रीरोग, नेत्ररोग,अस्थिरोग,बालरोग, कान-नाक-घसा आदी विविध आजारांवर तपासणी करून मोफत औषधोपचार केले.कळंब शहरातील दत्तनगर,शिवाजीनगर, इंदिरानगर,कल्पना नगर व शेरे गल्ली भागातील ७६१ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.त्यापैकी १३९ गंभीर रुग्णांवर पुढील उपचार मुंबई येथे करण्यात येणार आहेत.
    याशिवाय ज्या रुग्णांकडे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड नव्हते,त्यांना ऑनलाईन नोंदणी करून कार्ड देण्यात आले.
    या उपक्रमासाठी जनसंपर्क अधिकारी विनोद ओव्हाळ, नियोजन प्रमुख शेळके,कामराज भिसे,नेताजी कांबळे आदींनी परिश्रम घेतले.शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भूषण करंजकर, शहर उपाध्यक्ष किशोर वाघमारे, जिल्हा चिटणीस वनिताराणी कटाळे,युवा मोर्चा जिल्हा चिटणीस अशोक क्षीरसागर यांचे सहकार्य लाभले.
    नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून तेरणा ट्रस्टने सामाजिक बांधिलकीची जाणीव अधोरेखित केली.
error: Content is protected !!