February 9, 2026

वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या वतीने ब्रह्माचीवाडी येथे पोषण आहार कार्यक्रम उत्साहात संपन्न

  • कळंब – तालुक्यातील ब्रह्माचीवाडी येथे दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) च्या वतीने “पोषण महिना” निमित्ताने पोषण आहार कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
  • या कार्यक्रमात किशोरवयीन तरुणी,त्यांचे माता–पिता तसेच ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. पोषणाबाबत जनजागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी वॉटर ऑफिस कळंब येथील प्रियदर्शनी कांबळे यांनी संतुलित आहाराचे महत्त्व, लहान मुलांच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषणतत्वे तसेच गर्भवती व स्तनदा मातांच्या आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
  • कार्यक्रमाचे उद्घाटन गावच्या सरपंच सौ. अनुसया कानडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी किशोरवयीन मुली, महिला प्रवर्तक सौ. सुरेखा बोराडे, सौ. उर्मिला तवले आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये पोषणाबाबत जागरूकता वाढून बालक व महिलांच्या आरोग्य संवर्धनाला चालना मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगणवाडी सेविका यांनी केले तर आभार प्रदर्शन गावातील महिला बचत गटाच्या सदस्यांनी मानले.

error: Content is protected !!