धाराशिव- केंद्र सरकारने किमान कांदा,बटाटे व तत्सम भाजीपाला पिके हमी भावाच्या कक्षेत आणावीत.ज्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही व शेतक्रिया आर्थीक परस्थिती सुधारण्यास मदत होईल,याची नोंद घेऊन कांदा,बटाटे व तत्सम भाजीपाला पिके हमीभावाच्या कक्षेत आणण्यासाठी कायदा करुन शेतकऱ्यांना मदत करावी,अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली आहे. या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले की,महाराष्ट्र राज्यातील शेतकरी कांदा,बटाटे व तत्सम भाजीपाला पिके सातत्याने शेतीमध्ये खरीप-रब्बी व बारमाही घेतात.परंतू केंद्र सरकारच्या आयात-निर्यात धोरणाच्या धरसोडपणामुळे तसेच अतिवृष्टी व निसर्गाच्या लहरीपणामुळे कांदा, बटाटे व तत्सम भाजीपाला पिकांचे दर सातत्याने कोसळल्यामुळे शेतकऱ्यांच्या या पिकासाठी लागलेला उत्पादन खर्च व स्वत:शेतीमध्ये केलेले कष्टाचा कुठही ताळमेळ बसत नाही.हे कृषीमुल्य आयोगाच्या राहुरी विद्यापीठाच्या तज्ञ समितीचा निष्कर्ष असून तो कृषीमुल्य आयोगाकडे सादर केला आहे.सदरील समितीचा निष्कर्ष ग्राह्य धरुन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने यावर उपाय म्हणून किमान कांदा,बटाटे व तत्सम भाजीपाला पिके हमी भावाच्या कक्षेत आणावीत ज्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही व शेतकऱ्यांची आर्थीक परस्थिती सुधारण्यास मदत होईल याची नोंद घेऊन कांदा,बटाटे व तत्सम भाजीपाला पिके हमीभावाच्या कक्षेत आणण्यासाठी कायदा करुन शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान