कळंब – महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब शहरातील श्री हनुमान मंदिर, पुनर्वसन सावरगाव येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील व जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, नेरुळ (नवी मुंबई) यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराची सुरुवात श्री हनुमान मंदिरातील मूर्तीला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ फोडून करण्यात आली. या वेळी तेरणा ट्रस्टचे संचालक अशोकराव शिंदे, तालुकाध्यक्ष मकरंद पाटील, हनुमान मंदिर ट्रस्ट अध्यक्ष काळे, मुख्याध्यापक मुकुंद नांगरे, दयावान प्रतिष्ठानचे अध्यक्ष इम्रान मुल्ला, शिवाजी गिड्डे पाटील, माणिक बोंदर, संदीप बावीकर, किशोर वाघमारे, संजय घोगरे, प्रा. जालिंदर लोहकरे, संजय जाधवर, सुनिल गायकवाड, संतोष भांडे, सतपाल बनसोडे, समीर सय्यद, नितारणी कटाळे, जान्हवी पत्की, संगीता थोरात, संजय अडसूळ, प्रकाशकाका भडंगे, इलियास कुरेशी, दामोदर शिंदे, रमेश शिंदे, साखरे मामा आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात डॉ. सुनीता, डॉ. ऋग्वेदा, डॉ. श्रुती, डॉ. दीक्षा यांच्यासह जनसंपर्क अधिकारी विनोद ओव्हाळ, नियोजन प्रमुख शेळके, कामराज भिसे, गुंड, अशोक, गरड, नेताजी कांबळे आदींनी तपासणी व सेवा बजावली. कळंब शहरातील पुनर्वसन सावरगाव व गांधीनगर भागातील एकूण ६७३ महिला, पुरुष व बालकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. यामध्ये हृदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग यासह विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून उपचार केले. तसेच मोफत औषधोपचार देण्यात आले. गंभीर आजार असणाऱ्या ७२ रुग्णांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली पाठविण्यात येणार आहे. शिबिरात ज्या रुग्णांकडे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड नव्हते त्यांना मोफत ऑनलाईन नोंदणी करून आरोग्य कार्ड उपलब्ध करून देण्यात आले. शिबिराचे आयोजन भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष विकास कदम व सरचिटणीस परशुराम देशमाने यांनी केले.
🌸 “तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून आमचे नेते, तुळजापूरचे लोकप्रिय आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्यामुळे दरवर्षी हजारो रुग्णांचे प्राण वाचत असून लाखो रुग्णांना मोफत औषधोपचार व सेवा मिळत आहेत.” – विकास कदम, शहराध्यक्ष, भाजप युवा मोर्चा, कळंब
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड