February 9, 2026

पुराच्या पाण्यात बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला

  • कळंब – अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात बेपत्ता झालेल्या खोंदला (ता.कळंब) येथील शेतकरी सुबराव शंकर लांडगे (वय ६०) यांचा मृतदेह अखेर दहा दिवसांनी सापडला.
    घटना अशी की,सुबराव लांडगे हे खोंदला व केज तालुक्यातील भोपला सीमेवर असलेल्या ओढ्याच्या पुलावरून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पुराच्या प्रवाहात वाहून गेले होते. तेव्हापासून ते बेपत्ता होते.
    एनडीआरएफ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच स्थानिक यंत्रणांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली,मात्र ती यशस्वी ठरली नव्हती.अखेर दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांचा मृतदेह बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील लाखा शिवारात, मांजरा नदीच्या काठावर सापडला.
    संध्याकाळी ७ वाजता खोंदला येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
error: Content is protected !!