धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.23ऑगस्ट रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 284 कारवाया करुन 2,32,150 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे: आरोपी नामे-राम शंकर कदम, वय 40 वर्षे, रा. भिमनगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.23.08.2025 रोजी 18.30 वा. सु भिमनगर येथील अतुल जर्नाधन वाघमारे यांचे पत्र्याचे शेड समोर मोकळ्या जागेत अंदाजे 3,000 ₹ किंमतीची 30 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-दयानंद भानुदास देठे,वय 35 वर्षे, रा.बालाजीनगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.23.08.2025 रोजी 19.20 वा. सु धाराशिव ते तुळजापूर रोडचे बाजूला पत्राचे शेडमध्ये अंदाजे 1,600 ₹ किंमतीची 20 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
येरमाळा पोलीस ठाणे: आरोपी नामे-चंद्रकांत देविदास कडक्कर, महादेव मंदीर रोड तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव हे दि.23.08.2025 रोजी 15.45 वा. सु तेरखेडा ता.वाशी जि. धाराशिव येथे अंदाजे 4,400 ₹ किंमतीची 44 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे. नळदुर्ग पोलीस ठाणे: आरोपी नामे-बाबू लोका राठोड, वय 65 वर्षे, रा. वस्तसलानगर अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.23.08.2025 रोजी 18.20 वा. सु. अणदुर येथे सिकंदर किराणा दुकानाचे समोर अंदाजे 800 ₹ किंमतीची 10 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे. उमरगा पोलीस ठाणे: आरोपी नामे-बालाजी तुकाराम भोसले, वय 49 वर्षे, रा. कासार शिर्शी ता. निलंगा जि. लातुर ह.मु. जकेकुर ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.23.08.2025 रोजी 14.20 वा. सु. एस.एच.के. कंपनी समोरील रोडचे पलीकडे असलेल्या हातगाड्यावर अंदाजे 3,300 ₹ किंमतीची 33 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे. “ जुगार विरोधी कारवाई.” स्थानिक गुन्हे शाखा :जुगार विरोधी कारवाई दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी दि.23.08.2025 रोजी 18.00 वा. सु. तुळजापूर पो ठाणे हद्दीत उमेश देशमुख यांचे शेतात शेडच्या बाजूस कात्री येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-नेताजी संपतराव देशमुख, रा. कात्री ता. तुळजापूर, श्रीकांत हनुमंत देशमुख, नितीन दशरथ गोडगीरे, वय 36 वर्षे, गणेश दिलीप कांबळे, रामेश्वर चंदर शिंदे, विशाल अंकुश देशमुख सर्व रा. कात्री ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 18.00 वा. सु. उमेश देशमुख यांचे शेतात शेडच्या बाजूस कात्री येथे तिरट मटका जुगाराचे साहित्य एकुण 1,17,150 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे. लोहारा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान लोहारा पोलीसांनी दि.23.08.2025 रोजी 18.45 वा. सु. लोहारा पो ठाणे हद्दीत भातंगळी गावामध्ये हनुमान मंदीरासमोर मोकळ्या जागेत छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-बबन फत्तेपुरे, बालाजी गायकवाड, चंदहर्ष राजाभाउ जगताप, उत्तम जगताप, बालाजी जगताप सर्व रा. भांतगळी ता. लोहारा जि. धाराशिव हे 18.45 वा. सु. तिरट मटका जुगाराचे साहित्य एकुण 1,520 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले लोहारा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
नळदुर्ग पोलीस ठाणे:आरोपी नामे-गौस अब्दुल रहिमान कुरेशी, वय 29 वर्षे, रा.नळदुर्ग ता. तुळजापूर,जि. धाराशिव, मुनिर अयुब कुरेशी, वय 20 वर्षे, रा. नळदुर्ग, अरबाज मुस्ताक कुरेशी, वय 28 वर्षे, रा. नळदुर्ग, परवेज तौफिक कुरेशी, वय 23 वर्षे, रा. नळदुर्ग,वाहब गफार कुरेशी, वय 36 वर्षे, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.23.08.2025 रोजी 11.10 ते 13.10 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे ॲटो रिक्षा क्र एमएच 25 एके2533, ॲटो रिक्षा क्र एमएच 07 एन 8203,ॲटो रिक्षा क्र एनएच 13 टी 1315, ॲटो रिक्षा कृर एमएच 02 ईडब्ल्यु 5218 व ॲटो रिक्षा क्र एमएच 25 एफ 9336 ही वाहने नळदुर्ग बसस्थानक परिसरात सार्वजनिक रोडवर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना नळदुर्ग पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285 मोवाका अन्वये नळदुर्ग पो.ठा. येथे स्वतंत्र 5 गुन्हे नोंदवले आहेत.
” मारहाण.”
परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे- चैतन्य शेळके, शंभु थिटे, गणेश नलवडे, सर्व रा.भोत्रा रा. परंडा जि. धाराशिव यांनी दि.21.08.2025 रोजी 13.15 वा. सु. आय टी आय कॉलेजच्या समोर परंडा येथे फिर्यादी नामे-तुषार जालिंदर मुरकुटे, वय 16 वर्षे, रा. सोनारी ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गावातील मुलाबरोबर अज्ञात कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-तुषार मुरकुटे यांनी दि.23.08.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे परंडा येथे भा.न्या.सं.कलम 109, 115(2), 351(2), 352, 3(5), सह कलम 4/25 आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे- निजाम शेख, मोईन गॅसोद्दीन शेख, इब्राहिम अकील पटेल, परवेज अजीज पटेल, सोहेल अशफाक शेख, अझर शेख, सलमान काशीम शेख सर्व रा. तामलवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.08.2025 रोजी 20.30 वा. सु. तामलवाडी येथे फिर्यादी नामे-समीर रजाक मुल्ला, वय 21 वर्षे, रा. तामलवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मिरवणुक काढताना मला बैल का धरु दिली नाही कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडाने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-समीर मुल्ला यांनी दि.23.08.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे तामलवाडी येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115(2), 351(2),(3), 352, 3(5), 189(2),191(2), 190, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे- समीर रज्जाक मुल्ला, इरफान हामीद पठाण, सोहेल हामीद पठाण, सलमान जाकीर पठाण, इम्रान खलील बेगडे सर्व रा. तामलवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.08.2025 रोजी 20.30 ते 20.45 वा. सु. पान शॉप तामलवाडी जवळ ब्रिजच्या खाली सर्व्हीस रोडवर फिर्यादी नामे-अशीफ गय्यासोद्दीन शेख, वय 30 वर्षे, रा. तामलवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी दारु पिण्यास पैसे दे या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी व कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अशीफ शेख यांनी दि.23.08.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे तामलवाडी येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115(2), 351(2),(3), 352, 3(5), 189(2),191(2), 191(3),190, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
वाशी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-खुर्शीद अकबर शेख, वय 35 वर्षे, रा. भातअंतरवली ता. गेवराई जि. बीड यांचे अंदाजे 53,000₹ किंमतीची माल मोटार व रिवायडिंग वायर हा टेम्पोतुन दि.22.08.2025 रोजी 06.15 ते 07.15 वा. सु. पार्डी फाटा ते सरमकुंडी फाटा हायवे रोडच्या पेट्रोल पंप पाठीमागे राजस्थानी धाब्याजवळुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-खुर्शीद शेख यांनी दि.23.08.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-जुबेर शब्बीर शेख, वय 35 वर्षे, रा. वाळुज ता. गंगापुर जि. छ. संभाजीनगर यांचे ताब्यातील टेम्पोतील अंदाजे 12,696₹ किंमतीचा माल एक सेंन्सोडेंड कंपनीचे टुटपेस्टचा बॉक्स टेम्पोतुन दि.21.08.2025 रोजी 11.42 वा. सु. पारगावचे पुढे हायवे एनएच 52 रोडवर अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-जुबेर शेख यांनी दि.23.08.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-बालाजी विश्वनाथ भातलवंडे, वय 45 वर्षे, रा. दहिफळ ता. कळंब जि. धाराशिव यांचे दहिफळ मधील शेत गट नं 244 मधील पत्र्याच्या शेड चे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 22.08.2025 रोजी 10.30 ते दि. 23.08.2025 रोजी 06.00 वा. सु. तोडून शेडमधील 6 मोठी बकरी एकुण 60,000₹ किंमतीची चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बालाजी भातलवंडे यांनी दि.23.08.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 334 (4), 305 (ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
वाशी पोलीस ठाणे: मयत नामे- पुतळाबाई वसंत कांबळे, वय 65 वर्षे, रा. लहुजी नगर पाण्याच्या टाकीजवळ वाशी ता. वाशी जि. धाराशिव या दि.28.07.2025 रोजी 18.30ते 19.00 वा. सु. प्राजक्ता हॉटेलच्या समोर वाशी फाटज्ञ ते वाशी जाणारे रोडवर पायी चालत जात होत्या. दरम्यान मोटरसायकल कृर एमएच 25 व्ही 8327 चा चालक आरोपी नामे- अमीत सुनित गाडे, रा. वाशी ता. वाशी जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून पुतळाबाई कांबळे यांना पाठीमागुन धडक दिली. या अपघातात पुतळबाई कांबळे या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुखदेव वसंत कांबळे, वय 43 वर्षे, रा. लहुजी नगर पाण्याच्या टाकीजवळ वाशी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.23.08.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1), सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ऑनलाईन फसवणुक.”
सायबर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे- कालीदास लिंबाजी गवळी, वय 54 वर्षे, रा. शुक्रवार पेठ कणे गल्ली तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचा कुलगा कृष्णा यास जास्त पैशाचे अमिष दाखवून व शासनाची ऑनलाईन गेमची बंदी असताना सुध्दा exchange.com अशी लिंक तयार करुन मोबाईल नं 9091915891,9561463808,8485017490,8766406507,8446223584,8010781839,8446964554,73918220088 या मोबाईल नंबर वरुन व्हॉटसअपवर पाठवून फिर्यादी व फिर्यादीचे मुलाचे ऑनलाईन 16,85,498₹ ची फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कालीदास गवळी यांनी दि.23.08.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे सायबर येथे भा.न्या.सं.कलम 78, 356(2) सह कलम 66 (सी) माहिती व तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
“फिट इंडिया सायकल मॅराथॉन रॅलीचे आयोजन .”
मा. पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालय येथे आज दि. 24.08.2025 रोजी 07.00 वा. सु. सहाय्यक क्रिडा अधिकारी महाराष्ट्र राज्य पोलीस मुंबई यांचे पत्रान्वये फिट इंडीया सायकल मॅराथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या फिट इंडिया मिशन रॅली मध्ये शहरातील मा. जिल्हा अधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषद मैनक घोष,(भा.प्र.से), मा. पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, श्री. गौहर हसन, डिसीपी सोलापूर एकुण छत्रपती शिवाजी हायस्कुल व भोसले कॉलेजचे विद्यार्थी- शिक्षक व पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. या मॅराथॉन स्पर्घत भाग घेवून प्रथम व्दितीय येणाऱ्या सर्व स्पर्धकांना मेडल देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती. मा. जिल्हा अधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषद मैनक घोष(भा.प्र.से), मा. पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, श्री. गौहर हसन,डिसीपी सोलापूर पोलीस अधिकारी व अमंलदार यांसह विद्यार्थी उपस्थित होते.
जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
“धान्याचे गोडाऊन फोडून हरभरा चोरी करून नेलेल्या आरोपी यांना केले स्थानिक गुन्हे शाखेने अटक .”
दिनांक 23/08/2025 रोजी माला विषयीचे गुन्हे उघडकीस आणणे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक हे पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीवरून संशयित आरोपी नामे गौस वहीद पठाण वय 50 वर्ष रा एकता नगर धाराशिव, ता जि धाराशिव याच्याकडे चोरीचा मुद्देमाल आहे, अशी बातमी मिळाल्यावर सदर आरोपीस त्याचे वाहनासह सिताफिने ताब्यात घेऊन त्याचे कडे चौकशी केली असता त्याने विनायक ॲग्रो मौजे किनी जिल्हा धाराशिव या धान्याच्या गोडाऊन चे शटर तोडून त्याच्या साथीधारासह हरभऱ्याचे कट्टे चोरी केले असल्याचे सांगितले. त्यावरून पोस्ट ढोकी गुन्हे अभिलेख तपासला असता पोस्टे ढोकी गुर नं 235/ 25 कलम 305 अ 334 भान्यास अन्वये हरभऱ्याचे कट्टे चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले.नमूद आरोपीकडे चोरीचा मुद्दे मालाबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा मुद्देमाल अडत लाईन धाराशिव येथे विकला असल्याचे सांगितले त्यावरून सदर मुद्देमालाचा शोध घेऊन हरभऱ्याचे एकूण 2559 किलो वजनाचे 43 कट्टे आणि गुन्ह्यात वापरलेले अशोक लेलँड वाहन असा एकूण किंमत 6,29,000 रुपये किमतीचा चा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्याने त्याच्या अन्यसाथीदारांची नावे तसेच चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ताब्यात असलेल्या आरोपीने त्याच्या अन्य साथीदाराच्या मदतीने सदर चा गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सह पोलीस ठाणे, ढोकी येथे पुढील कारवाई कामी हजर केले आहे.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण,प्रकाश औताडे, जावेद काझी, फराहान पठाण, चापोका रत्नदीप डोंगरे, चापोका नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान