धाराशिव – पतसंस्था शिक्षकांना भक्कम आधार आहे.काटकसर व आर्थिक शिस्त असल्याने ही संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. संस्थेची अशीच प्रगती पुढे वृद्धीगत होईल.ही संस्था सहकार महर्षी पुरस्कारासाठी निश्चितच पात्र होईल असे प्रतिपादन मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम वसंतराव काळे यांनी केले. ते भाई उद्धवराव पाटील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था म.धाराशिवच्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता येथील पुष्पक मंगल कार्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष विशाल घोगरे होते.यावेळी व्यासपीठावर जनता बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे,पतसंस्था संस्थापक एम.डी.देशमुख,मुख्य प्रवर्तक पी.एन,चव्हाण,धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे,निवडणूक निर्णय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मुंडे,वसंतराव भोरे, जयपाल शेरखाने,व्ही.के.देशमुख, रामेश्वर चव्हाण,प्रा.अंकुश नाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. वसंतराव नागदे म्हणाले की भाई उद्धवराव पाटील शिक्षक पतसंस्था सभासद व संचालक यांच्यात समवनय असून संस्थेने विश्वास संपादन केला आहे.ही संस्था इतर पतसंस्थांना मार्गदर्शक म्हणून काम करेल असा आशावाद व्यक्त केला. यावेळी २५ सेवानिवृत्त सभासदांचा सपत्नीक सत्कार पुष्पहार,शाल,सन्मानचिन्ह व फेटा बांधून करण्यात आला,महात्मा फुले विद्यालय ताकविकी चे सहशिक्षक संस्थेचे सभासद असलेले दत्तात्रय दरेकर यांचे आकस्मित निधन झाले.त्यांच्या पत्नी सखुबाई दत्तात्रय दरेकर यांना कर्ज वजा जाता १७,१३,३३४( सतरा लाख तेरा हजार तीनशे चौऱ्याहत्तर) रुपये आर्थिक मदत संस्थेच्या कुटुंब कल्याण निधीच्या व्याजातून धनादेश देऊन करण्यात आली. वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित सभासदांना ५०० रुपये उपस्थित भत्ता रोख स्वरूपात देण्यात आला. पतसंस्थेचे सचिव अमरसिंह देशमुख यांनी सभेचे अहवाल वाचन करून प्रश्नोत्तराने सभेची सांगता झाली. सभासदांना ८% लाभांष सभासदांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करण्यात आला. एम.डी. देशमुख यांनी सभेस मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी भाई उद्धवराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले.सभेचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष विशाल घोगरे यांनी तर सूत्रसंचालन संचालक बालाजी तांबे यांनी केले. सभा यशस्वी करण्यासाठी संचालक विजयकुमार कुलकर्णी, उत्तरेश्वर चव्हाण, बाळासाहेब नरवडे, अमोल सरवळे, रवींद्र शिंदे, विलास खरात, ललिता लोमटे,सिंधू कांबळे,कर्मचारी करण पेठे,संतोष मोरे यांनी परिश्रम घेतले.या सभेस सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी उपस्थितांचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत पडवळ यांनी मानले.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान