कळंब – राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त,सेवा निवृत्त मुख्याध्यापक,अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे माजी जिल्हाध्यक्ष व शेवटचा श्वास असेपर्यंत सामाजिक कार्याला समर्पित राहिलेले ज्येष्ठ शिक्षक दत्तात्रय कमलाकरराव कुलकर्णी उर्फ डि.के.कुलकर्णी यांची ७६ वी जयंती दिनांक २२ ऑगस्ट रोजी सोजर मतिमंद विद्यालय,कळंब येथे अभिवादन कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कै.डि. के.कुलकर्णी यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. “खरा तो एकची धर्म” या प्रार्थनेने कार्यक्रमास सुरुवात झाली.यानंतर ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, डॉ. रमेश जाधवर,प्रकाश भडंगे, माधवसिंग राजपूत,संजय घुले यांनी डि.के.सरांच्या आठवणींना उजाळा दिला.सामाजिक जाणिवा आणि अखेरपर्यंत दिलेले योगदान तरुणांसाठी प्रेरणादायी व आदर्श निर्माण करणारे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमास धाराशिव मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे,रोटरी क्लब कळंबचे संजय देवडा,डॉ.सचिन पवार, धर्मेंद्र शहा, रोटी क्लब कळंब सिटीचे सचिव श्याम जाधवर, सामाजिक कार्यकर्ते बंडु (आबा) ताटे,अनिल यादव,अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला तालुकाध्यक्ष सोपान पवार,प्रदीप यादव तसेच सोजर मतिमंद विद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते. डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन सोपान पवार यांनी केले.याप्रसंगी मतिमंद विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व भोजनाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन यादव,वेदांत कुलकर्णी,किरण जोगदंड,सुरज सातव,गणेश शिंदे, सरवदे मॅडम यांनी परिश्रम घेतले.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड