कळंब – कळंब तालुक्याचा भूमिपुत्र व भोगजी गावचा रहिवासी डॉ.गोरख मुंडे यांनी नुकत्याच झालेल्या वैद्यकीय क्षेत्रातील NEET PG 2025 परीक्षेमध्ये भारत देशातून ऑल इंडिया रँक 1090 मिळवून परिसराचा मान उंचावला आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल वारकरी संप्रदाय मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांच्या शुभहस्ते डॉ.गोरख मुंडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.त्यामध्ये प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.रमेश जाधवर,मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड,स्व.गणपतराव कथले युवक आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब कथले,उद्योजक व शिवव्याख्याते महादेव खराटे, अखिल भारतीय साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर,पत्रकार रमेश अंबिरकर, मुख्याध्यापक निशिकांत आडसूळ, मुख्याध्यापक गौतम जाधवर, रामहारी मुंडे,अभिमान तांबडे, जनार्दन धुमाळे,बाबासाहेब कांबळे आदी मान्यवरांचा सहभाग होता. सत्कार प्रसंगी ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी, “सध्याच्या प्रचंड स्पर्धेच्या युगात कळंबच्या भूमिपुत्राने मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. भविष्यात सामाजिक दायित्व जोपासून वैद्यकीय व्यवसायातून गोरगरीब व दुर्बल घटकांची सेवा करावी, हाच खरा यशाचा अर्थ आहे” असे मार्गदर्शन केले. प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.रमेश जाधवर यांनी,“मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे” या भावनेने डॉक्टरकी करत समाजातील गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी केले. सूत्रसंचालन महादेव खराटे यांनी तर आभार प्रदर्शन परमेश्वर पालकर यांनी केले.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन