March 26, 2026

जीव गेला तरीही समानता हवीच – मेल नर्सेस बचाव समितीचा निर्धार

  • मुंबई – नर्सिंग क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या लिंगभेदी धोरणाच्या विरोधात मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्याच्यावतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.१८ ऑगस्ट २०२५ पासून आमरण उपोषण सुरू आहे. समिती पदाधिकारी सचिन खंदारे, दुर्गादास शिंदे, शंकर नाईकनवरे यांच्यासह नर्सिंग विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत.
    उपोषणकर्त्यांची प्रकृती गंभीर होत असून उलट्या,ताप,अशक्तपणा जाणवत आहे.तरीदेखील प्रशासनाची धक्कादायक भूमिका अशी की जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू असतानाही वैद्यकीय तपासणीसाठी वैद्यकीय टीम हजर नव्हती.
    नांदेड जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलेल्या निवेदनात समितीने मागण्या मांडल्या.
    नर्सिंग क्षेत्रातील लिंगभेदी नियम तात्काळ रद्द करावेत,संबंधित विभागाची बैठक घेऊन स्त्री-पुरुष समानता लागू करावी.
    शासनाने त्वरीत निर्णय घेतला नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अन्नत्याग आंदोलन पेटवले जाईल,समितीचा ठाम निर्धार नर्सिंग क्षेत्रामध्ये लिंगभेद रद्द होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही. “जीव गेला तरी चालेल, पण नर्सिंग क्षेत्रामध्ये समानता प्रस्थापित झालीच पाहिजे. शासनाने दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम भयंकर होतील, महाराष्ट्र पेटेल,” असा इशारा मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्राचे समन्वयक आदी बनसोडे यांनी दिला.
error: Content is protected !!