खामसवाडी – खामसवाडी येथील कु.प्राजक्ता अंगद माळी हिचा मिरज शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये व चि.छत्रपती शिवराज बाकले याचा धुळे शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित झाल्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यास राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाचे राज्य सरचिटणीस तसेच राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष भोजने,ओबीसी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष सावता माळी व सरचिटणीस सतीश वैद्य प्रमुख उपस्थित होते. यावेळी गावचे उपसरपंच दयानंद पाटील,अमर शेळके,ज्ञानेश्वर माळी,सर्जेराव बाकले,दिलीप शेळके,सुनील माळी,संदीप जाधव,युवराज माळी,सतीश पाटील,प्राजक्ता माळीचे आईवडील,आजी-आजोबा तसेच बाकले कुटुंबीय उपस्थित होते. भविष्यात चांगले डॉक्टर बनून गोरगरिबांसाठी रुग्णसेवा करण्याचे कार्य या विद्यार्थ्यांकडून व्हावे, अशी अपेक्षा यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी