February 12, 2026

प्रा.आप्पासाहेब मिटकरी यांनी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने सेवा केली – डॉ.अशोकराव मोहेकर

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे कनिष्ठ उपप्राचार्य प्रा.आप्पासाहेब मिटकरी यांनी तब्बल ३३ वर्षे रसायनशास्त्र विषयाचे अध्यापन करताना प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने सेवा केली,असे गौरवोद्गार ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांनी काढले.
    महाविद्यालयात श्री.व सौ. मिटकरी यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोकराव मोहेकर होते. यावेळी व्यासपीठावर ज्ञान प्रसारक मंडळाचे संचालक तात्यासाहेब पाटील,डॉ.डी.एस.जाधव,प्रा.जी. ए.घोलप,प्रा.अंजलीताई मोहेकर,रमेश (भाऊ) मोहेकर,हनुमंत ( तात्या) मडके,प्राचार्य अविनाश मोरे,प्राचार्य.अजित साळवे,प्राचार्य डॉ.हेमंत भगवान, उपप्राचार्य तथा सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक के.डी.जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच प्रा.मिटकरी यांच्या मातोश्री,प्रा.कल्याण मिटकरी, प्रा.संजय भोसलेही उपस्थित होते.
    कार्यक्रमाची सुरुवात पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमापूजनाने झाली. प्रा.व्ही.आर.आडसूळ यांनी कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन केले तर प्रा.प्रणिता खोसे यांनी आभार मानले.
    यावेळी प्रा.डॉ.दत्ता साकोळे,प्रा.जयंत भोसले,प्रा.संजय मिटकरी,प्राचार्य कदम,प्रा.डॉ.मीनाक्षी भवर,प्रा.डॉ.वर्षा सरवदे, प्रा.शेळके यांनी आपली मनोगते व्यक्त करून प्रा.मिटकरी यांच्या कार्याचा गौरव केला.
    कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!