धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील समाजकार्य व साहित्य क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या मीना अरुण महामुनी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धाराशिव जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे,राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगीताई काळभोर व मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष तु.दा.गंगावणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. महामुनी यांच्या सामाजिक व साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली असून,त्यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२८ पर्यंत राहणार आहे. समाजात सात्विक विचारांची पेरणी करून साहित्यिक चळवळ सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्या कार्यरत राहतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. या नियुक्तीमुळे धाराशिव जिल्ह्यातील साहित्यप्रेमी व महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून,विविध क्षेत्रातून मीना महामुनी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य