June 20, 2026

समता इंग्लिश स्कूलमध्ये दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा

  • कळंब – सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, शिराढोण संचलित समता इंग्लिश स्कूलमध्ये दि.१६ ऑगस्ट २०२५ रोजी पारंपरिक दहीहंडी उत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र खडबडे होते.यावेळी मुख्याध्यापक वनिता टोम्पे तसेच शिक्षकवृंदातील प्रियांका ताबडे,प्रियांका सोळंके, प्रतिभा टकले,मोहिनी देवकते, प्रमोद चव्हाण,नितीन पाटोळे व अंजना वाळके यांची विशेष उपस्थिती लाभली.
    या प्रसंगी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या औचित्याने सादर केलेल्या आध्यात्मिक गाण्यावर नृत्य सादर करून वातावरणाला भक्तिमय रंग दिला.शाळेच्या प्रांगणात फोडण्यात आलेल्या दहीहंडीने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
    अखेरीस प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना परंपरा,ऐक्यभावना व सहकार्याची शिकवण या सणातून घेण्याचे आवाहन केले.
error: Content is protected !!